Relationship Tips : सोशल मीडियावरील Reels बघून जोडीदारासोबत तुलना करत असाल तर सावधान! जाणून घ्या परिणाम
Relationship Tips : आजकाल अनेकांना सोशल मीडियावर रिल्स पाहिल्याशिवाय झोपही येत नाही. रीलमध्ये जे काही दाखवले जाते ते सत्य म्हणून ते आंधळेपणाने स्वीकारतात.
Relationship Tips : सध्या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा बोलबाला पाहायला मिळतोय. या सोशल मीडियाच्या गर्दीत Reels आणि Memes पाहायला मिळतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल, आजकाल अनेकांना सोशल मीडियावर रिल्स पाहिल्याशिवाय झोपही येत नाही. रीलमध्ये जे काही दाखवले जाते ते सत्य म्हणून ते आंधळेपणाने स्वीकारतात. या रील्स आणि सोशल मीडियावर रोज काही ना काही घडत राहतं, त्यातली एक म्हणजे 'रिलेशनशिप टेस्ट'. यामध्ये असे रिल्स व्हायरल होत राहतात, ज्यामुळे आपणही गंमत म्हणून का होईना अनेकजण तुलना करू लागतात. पण कधी कधी या चाचण्या नात्यांवर चुकीचे वास्तव मांडतात.
सोशल मीडियामुळे आयुष्य झालंय सोपं
समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याची आपली नेहमीच इच्छा असते. सोशल मीडियावरही अनेक पद्धती सांगितल्या जातात. त्यांचा अवलंब केल्यावर जेव्हा अपेक्षित परिणाम मिळत नाही, तेव्हा मन दुःखी होते आणि नात्यात गैरसमज निर्माण होतात. सोशल मीडियामुळे तुमचे आयुष्य खूप सोपे झाले आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसतसे ते तुमचं मनोरंजनही करत आहे.
सोशल मीडियावर Reels पाहून कधीही मनावर घेऊ नका
सोशल मीडियासह इतर अनेक प्लॅटफॉर्मवर तुमच्या नात्यातील प्रेम मोजण्यासाठी तुम्हाला अनेक पॅरामीटर्स सांगितले जाऊ शकतात, परंतु ते कधीही मनावर घेऊ नका. यामुळे तुमचे नाते बिघडू शकते किंवा नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो. रिल्समध्ये अनेक रिलेशनशिप टेस्ट सांगितल्या जातात. ज्याची तुलना तुमच्या नात्यात करत असाल तर आताच थांबा. कारण याचे निकाल तुम्हाला हवे तसे भेटले नाही, तर ते तुम्हाला मनातून दु:खी बनवतात. तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होऊ लागतात. यामुळे, तुमचे नाते लवकरच किंवा नंतर बिघडू लागते.
रिलेशनशिप टेस्टचा वाढता कल
सोशल मीडियाचा सर्वात नकारात्मक परिणाम तुमच्या नातेसंबंधांवर होतो. ही गोष्ट तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचली आणि ऐकली असेल, पण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आजकाल, सोशल मीडियावर विचित्र नातेसंबंधांच्या चाचण्या ट्रेंडमध्ये आहेत. इमेज टेस्ट, ऑरेंज पील टेस्ट, केचअप टेस्ट इत्यादी लोकप्रिय रिलेशनशिप चाचण्या आहेत. याशिवाय लोक सोशल मीडियावर रिलेशनशिपसाठी टॅरो कार्ड रीडिंग, ओरॅकल कार्ड रीडिंग, एंजेल नंबर, कँडल वॅक्स रीडिंग, रूम्स रीडिंग, नंबर सिलेक्शन इत्यादी गोष्टी ऐकतात. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की या संबंधांच्या चाचण्या आणि वाचन प्रत्येकासाठी समान आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे कुठले? तुम्ही सुशिक्षित आहात, हुशार आहात, चांगले-वाईट सर्वकाही समजतो, मग या परीक्षा किंवा वाचनात अडकून तुमचे नाते का बिघडवता?
सोशल मीडियातही तयार होतं निराशेचं एक अफाट जग
रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात, सोशल मीडिया फक्त नावापुरता सोशल आहे. खऱ्या नात्यांसोबत कधीही तुलना नका. सुख-दु:ख, राग, अपमान, निराशेचं एक अफाट जग सोशल मीडियातही तयार होतं. तुम्ही तिथे जे पाहता, तेच तो तुम्हाला दाखवू लागतो. जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्हाला फक्त दुःखी कंटेट दाखवली जाते, ज्याच्याशी तुम्ही जोडलेले आहात. यामुळे तुम्ही नकारात्मकही होतात. काळ आणि बदलानुसार वाटचाल करणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण नक्कीच आहे, परंतु त्याच्या वाढत्या भ्रमांमुळे आपल्या संस्कृती आणि सभ्यतेच्या रूढी, कौटुंबिक, सामाजिक प्रतिष्ठा आणि नैतिक मूल्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञ सांगतात, कोणताही खेळ किंवा चाचणी आपल्या प्रेमाबद्दल सांगू शकत नाही. ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत किंवा तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहात? हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला माहीत आहे.
दक्षता आवश्यक
सोशल मीडिया आज बहुतेक लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. तुमच्या नात्याला काही कामाची गरज आहे, हे तुम्हाला या चाचणीतून कळले तर मदत मागायला अजिबात संकोच करू नका आणि नाते सुधारण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा, नकारात्मक परिणाम मिळताच, आपण आपल्या जोडीदाराशी भांडणे सुरू करतो. इथूनच नात्यात दरारा निर्माण होऊ लागतो, या नात्याच्या चाचणीची सकारात्मक बाजू पाहताना, ते तुमच्या नात्यात समुपदेशक म्हणूनही काम करते आणि एक जोडपे म्हणून तुम्हाला तुमच्या नात्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे हे सांगते. त्यामुळे त्यांच्याशी भांडू नका. परीक्षेला गांभीर्याने घेण्यापेक्षा त्यांच्याशी बोलणे चांगले. काही अडचण असेल तर एकत्र सोडवा.
समर्पण आणि चाचणी यातील फरक
तुमचे नाते काही महिने, एक वर्ष, दोन वर्षे किंवा अनेक वर्षांचे असते. अशा परिस्थितीत नात्याची मुळे किती खोलवर आहेत हे कुठलीही चाचणी सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने या चाचण्या करून पाहिल्यास, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणामांसाठी तयार रहा. परिणाम काहीही असो, त्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ नये. शक्य तितके, या निरुपयोगी चाचण्या आणि वाचनांच्या फंदात पडू नका. जे तुमचे आहे ते तुमचेच राहील हे लक्षात ठेवा. निरोगी नातेसंबंधात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संवाद, परस्पर आदर आणि प्रेम राखणे. लक्षात ठेवा, तुमचे प्रेम निश्चित करण्यासाठी तुम्हाला रिलेशनशिप टेस्टची गरज नाही.
हेही वाचा>>>
Relationship Tips : नात्यात तणाव असूनही महिला का जपतात नातं? कितीही झालं तरी वेगळ्या होत नाहीत? कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )