Protein Deficiency Symptoms : प्रथिने आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. नवीन स्नायू तयार करण्यासाठी, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, तसचे हार्मोन्स, संतुलित ठेवण्यासाठी प्रथिने फार आवश्यक आहेत. शरीरातील ऊती प्रथिनांपासून बनतात. वाढत्या मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये प्रथिनांची कमतरता अधिक सामान्य आहे. तथापि, जगभरातील मोठ्या संख्येने लोक प्रोटीनच्या कमतरतेने त्रस्त आहेत. अनेक वेळा शरीरात प्रथिनांची कमतरता असते हेही आपल्याला माहीत नसते. मात्र,  प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक लक्षणे दिसतात. शरीरात प्रोटीनची कमतरता आहे हे कसे शोधायचे ते जाणून घेऊयात. 


प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे :


1. प्रोटीनच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात.


2. प्रथिनांच्या कमतरतेमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. 
3. स्नायू कमकुवत होतात आणि स्नायूंमध्ये वेदना होतात. 
4. प्रथिनांच्या कमतरतेचा परिणाम मुलांच्या वाढीवर, विशेषतः उंचीवर होतो. 
5. प्रथिने कमी असल्यास चेहरा, त्वचा आणि पोटात सूज येते. 
6. त्याचा परिणाम केसांवर दिसून येतो. केस कोरडे होतात, निर्जीव होतात आणि खूप गळतात. 
7. नखांमध्ये इन्फेक्शन होऊन नखे तुटायला लागतात.
8. खूप थकवा जाणवणे आणि उर्जेची कमतरता जाणवते.
9. शरीर एकदम फुगलेले आणि लठ्ठ दिसू लागते. 
10. नवीन पेशी उशिरा तयार होतात, त्यामुळे बरे होण्यास वेळ लागतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :