Friendship Viral Video : नाती जपणं ही गोष्ट काही लोकांसाठी महत्वाची असते. मग नातं रक्ताचं असो किंवा मानलेलं काही लोक प्रत्येक नात्याला त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान देतात. मैत्री हे नातं देखील अनेकांच्या जीवनातील महत्वाचं नातं आहे. शोलेमधील जय-वीरु यांच्या मैत्रीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. पण रिल नाही तर रिअल लाइफ जय-वीरुच्या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपचे गाणी गात असतानाचे किंवा डान्स करत असतानाचे व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण या जय-वीरुच्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला खरी मैत्री दिसेल. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन मुलं रस्त्याच्या बाजूनं चालत आहेत. दरम्यान एक कार त्या दोन मुलांपैकी एका मुलाच्या अगदी जवळ येते. तो मुलगा गाडीला धडकण्याच्या आधीच त्याचा मित्र त्याला धरुन ओढतो. त्यामुळे अनर्थ टळतो. rvcjinsta या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला पाहून अनेक नेटकरी भावूक झाले. या व्हिडीओला 'अनमोल दोस्ती'असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. या व्हिडीओला आठ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं असून आठ हजारपेक्षा जास्त युझर्सनं कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट करुन लिहिलं, ही खरी मैत्री आहे. तर दुसऱ्यानं लिहिलं, 'असा मित्र प्रत्येकालाच मिळावा' काही लोक मात्र त्या गाडीच्या ड्रायव्हरवर भडकले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या