Summer Self Care : आरोग्य जपण्यासाठी सॅनिटायझर (Sanitizer) वापरतात. कोरोना विषाणूमुळे लोकांना सॅनिटायझरचा वापर अधिक वाढला आहे. त्यामुळे अलिकडे प्रत्येक जण सॅनिटायझर (Hand Sanitizer) वापरताना पाहायला मिळतो. अशावेळी अनेक जण प्रवासात गाडीमध्येही सोबत सॅनिटायझर ठेवतात. मात्र हिवाळा आणि पावसाळ्याप्रमाणे उन्हाळ्यात सॅनिटायझर कारमध्ये ठेनू नका. मुख्य म्हणजे जर तुम्ही गाडी उन्हात उभी करत असाल तर सॅनिटायझर कारमध्ये ठेवणं टाळा.


सॅनिटायझर गाडीमध्ये ठेवल्याने आग लागते हा गैरसमज असून तो दूर करा. गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे हे तुमच्या कारसाठी धोकादायक आहे. उष्णतेमुळे हे सॅनिटायझर वाहनात पसरू शकते. अशा स्थितीत वाहनाच्या आजूबाजूच्या परिसरात थोडीशी ठिणगी पडली तर सॅनिटायझरला आग लागण्याची शक्यता असते. 


सॅनिटायझर ठरू शकतं धोकादायक
अमेरिकेच्या फायर ब्रिगेडने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, तुमच्या कारमध्ये ठेवलेली कोणतीही पारदर्शक बाटली, जी पारदर्शक द्रवाने भरलेली असते, ती तुमची कार आगीसाठी अत्यंत संवेदनशील बनवते. अगदी तुमच्या गाडीत ठेवलेली बाटली पाण्याने भरलेली असली तरीही ती धोकादायक ठरू शकते. याचं कारण प्रतिबिंब (Reflection) आहे. 


सॅनिटायझरची बाटली तुमच्या कारमध्ये ठेवल्यास त्यामध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे अपघात होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. ब्रिटनस्थित वेस्टर्न लेक फायर ब्रिगेडकडून असेही सांगण्यात आलं आहे की, सर्वांनी याबाबत जागरुक असणं गरजेचं आहे. यामुळे अपघात होण्याआधीच तो थांबवता येईल. कोरोनामुळे सॅनिटायझरचा वापर खूप वाढला आहे, त्यामुळे लोकांनी जागरूकता बाळगणं गरजेचं आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :