Unhealthy Diet for Kids: मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी, त्यांना योग्य आणि पोषक आहार देणे आवश्यक आहे. प्रत्येक आई आपल्या लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घेत असते. पालक या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देतात. पण, लहान मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी त्यांना अनेकदा बाहेरचे तळलेल, मसालेदार पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स दिले जातात. मात्र, हे पदार्थ मुलांचे नुकसान करू शकतात. अशा, अरबट-चरबट पदार्थांमुळे मुलांच्या प्रतिकारशक्तीवर तसेच, त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो.


अशा पदार्थांच्या सततच्या सेवनामुळे मुलांच्या वाढीवरही मोठा परिणाम होतो. चला तर, जाणून घेऊया लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अशाच काही ‘जंक’ फूडबद्दल...


फ्रुट फ्लेवर पदार्थ


फळांची चव असलेल्या गोष्टी त्याच फळांपासून बनवलेल्या असतील, असे समजण्याची चूक करू नका. उदाहरणार्थ, फ्रूट गमीज, केक, कँडीज यासारख्या गोष्टी पूर्णपणे साखरेने भरलेल्या असतात. हे पदार्थ साखर आणि रसायनांनी भरलेले असतात, जे मुलांच्या दातांना चिकटतात आणि दातात पोकळीची समस्या निर्माण करतात.


फ्रेंच फ्राईज


मुलांना बटाट्यापासून बनवलेला ‘फ्रेंच फ्राईज’ हा पदार्थ प्रचंड आवडतो. पण, ट्रान्स फॅट आणि कॅलरींनी भरलेला हा पदार्थ मुलांच्या पचनासाठी हानिकारक आहे. त्याऐवजी, तुम्ही मुलांना रताळे किंवा इतर भाज्यांनी बनवलेले फ्रेंच फ्राईज देऊ शकता, जे ऑलिव्ह ऑईलमध्ये तळले पाहिजेत.


साखरयुक्त पदार्थ


साखरेपासून बनवलेल्या गोष्टींमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. म्हणजेच क्रीम रोलमध्ये चरबी आणि साखर वगळता कोणतेही पोषक घटक नसतात. त्यामुळे याच्या सेवनाने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मुलांच्या आहारात जास्तीत जास्त फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करावा.


सॉफ्ट ड्रिंक्स


सोडा किंवा कोल ड्रिंक्समधील घटकांमुळे मधुमेहासह लठ्ठपणाचा धोका उद्भवू शकतो. म्हणून मुलांना पॅकेज्ड फूड किंवा फळांचे रस देऊ नका. त्यात फक्त सोडा आणि साखर असते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :