What Is Green Coffee : 'ग्रीन कॉफी' (Green Coffee) म्हणजे हिरवी कॉफी बनवण्यासाठी हिरव्या रंगाच्या बिया कॉफीच्या रोपापासून वेगळ्या केल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात. या बिया बारीक केल्यानंतर कॉफी पावडर बनवली जाते. कधीकधी हिरव्या बिया न भाजता वाळवून हिरवी कॉफी पावडर तयार केली जाते. म्हणजे कॉफी बीन्स पूर्णपणे भाजून न घेता त्यांचा हिरवा रंग कायम ठेवून कॉफी बीन्सपासून बनवलेल्या कॉफीला 'ग्रीन कॉफी' म्हणतात. जाणून घ्या ग्रीन कॉफी पिण्याचे कोणते फायदे आहेत.
ग्रीन कॉफीचे फायदे
1. ग्रीन कॉफी लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते : ग्रीन कॉफीमध्ये अँटीओबेसिटी फॅक्टर असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, ग्रीन कॉफीमध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे एखाद्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते. ग्रीन कॉफीमुळे चयापचय क्रिया व्यवस्थित राहते.
2. ग्रीन कॉफीचे अनेक फायदे : काही संशोधनात असे आढळून आले आहे की, रक्तदाबाच्या रुग्णांनाही कॉफीचा फायदा होतो. ग्रीन कॉफी पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. ग्रीन कॉफीमुळे हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्युअर यासारखे मोठे आजार प्रतिबंधित केले जाऊ शकते.
3. एनर्जी ड्रिंक ग्रीन कॉफी : ग्रीन कॉफी बीन्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. यामुळे शरीर आपल्या शरीरात पोषण टिकून राहते. ग्रीन कॉफी प्यायल्याने पोट भरलेले वाटचे आणि यामुळे शरीरात उर्जा राहते.
4. डोकेदुखीमध्ये फायदा : ग्रीन कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे डोकेदुखी झाल्यास ग्रीन कॉफी प्यायल्याने काही काळ डोकेदुखीपासून आराम मिळतो. ग्रीन कॉफीमध्ये कॅल्शियम देखील आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
5. ताणातून आराम मिळतो : एक कप ग्रीन कॉफी प्यायल्याने तणावातून आराम मिळतो. जर तुम्हाला कॉफी आवडत असेल, तर ब्रेकमध्ये किंवा तुम्हाला पाहिजे तेव्हा एक कप ग्रीन कॉफी प्या, यामुळे चांगला अनुभव येतो आणि तणाव कमी होण्यास मदत होईल.
ग्रीन कॉफी कशी बनवाल?
- एका कपमध्ये एक ते दीड चमचे ग्रीन कॉफी पावडर घ्या.
- त्यात एक कप गरम पाणी घाला.
- हे 5 ते 6 मिनिटे राहू द्या.
- यानंतर कॉफी गाळून घ्या आणि.
- चांगल्या चवसाठी यामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर घाला.
- चांगल्या परिणाम दिसण्यासाठी किमान एक ते दोन महिने जेवणापूर्वी प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Food Poisoning : उन्हाळा आणि पावसात होते विषबाधा, 'ही' आहेत लक्षणे
- Home Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..
- Hiccup : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )