Protein Benefits And Symptoms : प्रोटीन शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी गरजेचे आहे. प्रोटीन स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सना वाढविण्याचे काम करतात. प्रोटीन खाण्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. अधिकतर लहान मुलांमध्ये, वृद्धांमध्ये आणि आजारी व्यक्तींमध्ये प्रोटीनची कमतरता असते. जर शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्हाला दिवसभर थकवा, अंगदुखी तसेच सांधेदुखी जाणवू शकते. तुमच्या केस आणि नखांचा अधिकतर भाग हा प्रोटीनपासूनच तयार होतो. प्रोटीन शरीरात अनेक प्रकारचे रसायन आणि हार्मोन्स निर्माण करण्याचे काम करतात. तुमच्यामध्ये जर प्रोटीनची कमतरता असेल तर तुम्हाला तणावदेखील जाणवू शकतो. यासाठी प्रोटीनचे फायदे आणि प्रोटीनच्या कमतरतेचे लक्षणं नेमकी कोणती आहेत ते जाणून घ्या. 


प्रोटीनमुळे शरीराला मिळणारे फायदे (Benefits of Protein)


1. झटपट ऊर्जा - शरीराला कार्बोहायड्रेट आणि फॅटने ऊर्जा मिळते. परंतु, जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करत असाल तर तुमच्या शरीरात प्रोटीनयुक्त ऊर्जा तुम्हाला मिळते. प्रोटीन शरीराला झटपट ऊर्जा देण्याचे काम करतात. 


2. हाडांना मजबूत करण्याचे काम - प्रोटीनमुळे तुमची हाडे मजबूत होतात.  हाडांना मजबूत करण्याचे काम प्रोटीन करतात. 


3. इम्युनिटीला मजबूत करण्याचे काम - तुमच्या इम्युनिटी सिस्टीमला मजबूत करण्यासाठी प्रोटीन आणि अॅमिनो एसिडची आवश्यकता असते. इम्युन सिस्टीममध्ये टी सेल्स, बी सेल्स आणि प्रतिकारशक्ती बनवण्याची ताकद असते. 


4. लवकर भूक न लागणे - प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही. प्रोटीन तुमच्या मेंदूसाठी तसेच पोटासाठी फायदेशीर आहे. 


5. वाढलेली चरबी कमी करतात - प्रोटीन शरीरात मेटापॉलिझम वाढवण्याचे काम करतात. जर तुम्ही दिवसभरात जास्त कॅलरी बर्न करतात तर तुम्हाला प्रोटीन योग्य प्रमाणता घेणे गरजेचे आहे. 


6. निरोगी हृदयासाठी फायदेशीर - अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे की, प्रोटीन खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. प्रोटीनमुळे हृदयाच्या समस्या कमी जाणवतात. 



 प्रोटीनच्या कमरतेची लक्षणं (Protein Deficiency Symptoms)  



1. प्रोटीनच्या कमतरतेमुळे चेहरा, त्वचा, आणि पोटाला सूज येऊ शकते. 


2. केसगळतीची समस्या जाणवते.


3. शरीराची झीज होत असल्याने सांधेदुखीचा त्रास जाणवतो. 


4. पेशींमध्ये प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्नायूंना त्रास होतो. 


5. शरीरात प्रोटीन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखं तुटू लागतात.  


6. प्रोटीनच्या कमतरतेमुळे लहान मुलांची उंची वाढत नाही. त्यामुळे मुलांच्या खाण्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा नक्की समावेश करा. 


7. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha