Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याचपाश्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यातल्या राजकीय रणधुमाळीवर एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यावेळी शिवसेनाही गोव्यात निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच कोणत्याही पक्षासोबत युती होण्याची शक्यता नसल्यानं शिवसेना स्वबळावर ही निवडणूक लढणार, असंही त्यांनी म्हटलंय. याचबरोबर गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनीही राजकीय रिंगणात उतरून आपली ताकद दाखवावी. त्यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार, असंही आश्वासन संजय राऊत यांनी दिलीय.
नुकतीच संजय राऊत यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी गोवा विधानसभा निवडणूकीवर भाष्य केलं. शिवसेना यंदा गोव्यात निवडणूक लढवणार आहे. शिवसेना पंधरा जागेवर निवडणूक लढवणार आहेत. गोव्यातील काँग्रेस वेगळ्या लाटेवर आहे. त्यामुळं कोणाबरोबर युती नाही आणि शक्यताही नाही. जे येतील त्यांच्यासह अन्यथा त्यांच्याशिवाय निवडणूक लढू, असं सजंय राऊतांनी म्हटलंय.
भाजपविषयी लोकांच्या मनात नाराजी
गोव्यात भाजप अजूनही स्वबळावर आली नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर असतानाही भाजपला बहुमत मिळालं नाही. आगामी निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळणार नाही. भारतीय जनता पक्षाविषयी लोकांच्या मनात नाराजी आहे. लोक त्यांना निवडणून देणार नाहीत, असंही संजय राऊत यांचं भाकीत केलंय.
उत्पल पर्रिकर यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार
मनोहर पर्रिकर हे गोव्यातील प्रमुख नेते होते. त्यांचा गोव्यात प्रभाव होता. गोव्यात भारतीय जनता पक्षाचं संघटनं वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गोव्याला नवीन दिशा देण्याचं काम केलं. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी राजाकारणात येण्याच इच्छा व्यक्त केली. परंतु, त्यावेळी त्यांना ज्या पद्धतीनं अपमानित करण्यात आलं, हे गोव्यातील जनतेला आवडलं नाही. परंतु, उत्पल यांनीच निर्णय घेण्याची गरज आहे. ते नक्की निवडणून येतील. त्यांना गोव्याची जनता पाठिंबा देईल. तसेच उत्पल पर्रिकर यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार, असं आश्वासनही राऊतांनी दिलंय.
हे देखील वाचा-
- Barshi Scam : बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणी पहिली अटक; मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भाऊ ताब्यात
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला, आता फक्त राणेंचा फोटो
- Majha Impact : बापासाठी 'धावणाऱ्या' जिगरबाज लेकी! पारनेरच्या भगिनींना दत्ता मेघेंकडून मदतीचा हात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha