Health Tips Cold and Cough Remedies : हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. (Winter Season) थंडीमध्ये काही लोकांना सतत सर्दी किंवा कफचा त्रास (Cold and Cough Problem in winter) होतो. तुम्हाला जर थंडीमध्ये सतत सर्दी  असेल तर हे घरगुरी उपाय तुम्ही ट्राय करू शकता.  


भरपूर पाणी प्या 
जर तुम्हा सर्दी झाली असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिले पाहिजे. पाणी जास्त प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे तुमच्या  नोजल ट्रॅकमध्ये असणाऱ्या म्यूकस हा पातळ होईल त्यामुळे नाकातून सर्व सर्दी बाहेर येईल. 


हर्बल टी प्या
हर्बल टी प्यायल्याने सर्दी होत नाही. हर्बल टीमध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते. तसेच तुम्ही आल्याचा चाहा आणि ग्रीन टी देखील पिऊ शकता. 


वाफ घ्या  
हिवाळ्यात सर्दी किंवा कफ झाला तर सर्वप्रथम वाफ घ्या. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते. त्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो.  वाफ घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन थेंब टाका.  दिवसातून दोन वेळा या पाण्याची  घेतल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल. 


जर हिवाळ्यात सतत कफ होत असेल तर दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने गुळण्या करा. या पाण्यामध्ये मिठ टाका. यामुळे कफ कमी होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार


skin Care Tips : चेहऱ्यावरील पिम्पल्स होतील दूर; 'हे' टोनर ठरेल फायदेशीर, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत


Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत