Diet Tips And Food In Corona : संपूर्ण देशात पुन्हा एकदाचा कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रूग्णसंख्या समोर येत आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा वेग हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने वाढतोय. यामुळेच लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे दिल्ली-मुंबईसह अनेक राज्यांत नवे निर्बंध लादले गेले आहेत. राज्य सरकारकडून वारंवार विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले जात आहेत. अशा वेळी खाण्या-पिण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तुमची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करा. 


कोरोनापासून वाचण्यासाठी तसेच इम्युनिटी सिस्टीमला मजबूत करण्यासाठी WHO ने आहारासंबंधी काही टिप्स सांगितल्या आहेत. 
 
1. घरी शिजवलेले ताजे अन्न खावे : 
कोरोना काळात शक्यतो बाहेरचे जेवण टाळणेच गरजेचे आहे. यामुळे इन्फेक्शन होऊन धोका वाढू शकतो. घरी शिजवलेले अन्न हे स्वच्छ तर असतेच पण त्याचबरोबर पौष्टिकही असते. 


2. अधिक खाणे टाळा :
काही लोक जीभेचे चोचले पुरविण्याच्या नादात जास्त जेवण जेवतात. कधीतरी असे केल्यास इतका फरक पडत नाही. पण रोज अति प्रमाणात खाल्ल्यास तुमच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. रोज किमान 30 मिनिटे चाला. 


3. मीठ कमी करा :
तुमच्या हृद्याला हेल्दी आणि तंदुरूस्त ठेवण्यासाठी कमी प्रमाणात मीठाचा वापर करा. निरोगी व्यक्तीला दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठाचे सेवन केले पाहिजे. खासकरून फ्रोजन फूडचे सेवन करणे टाळा. यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. 


4. साखरेचा वापर मर्यादित करा :
मीठाप्रमाणेच साखरदेखील शरीरासाठी हानिकारक आहे. WHO च्या माहितीनुसार, ज्येष्ठ व्यक्तींनी दिवसातून फक्त 6 चमच्याहून कमी साखरेचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे अशा फळांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा ज्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे. तुम्ही ताजी गोड फळं नक्कीच खाऊ शकता. 


5. भरपूर पाणी प्या :
जी व्यक्ती दिवसाला 10 ग्लास पाणी पिते ती व्यक्ती जास्त काळ निरोगी राहते. यामध्ये साखरेचा वापर केलेले पेय आणि बॉटल बंद पाणी घेणे टाळा. तुम्ही पाण्याव्यतिरिक्त नारळ पाणी किंवा लिंबू पाण्याचा देखील डाएटमध्ये समावेश करू शकता. निरोगी राहण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे गरजेचे आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha