Immunity Booster : कोरोनाच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. थंडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, अशा स्थितीत विषाणू शरीरावर लवकर हल्ला करतो. शरीर मजबूत ठेवण्यासाठी आणि संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी, तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असणे महत्वाचे आहे. यासाठी तुमचा आहार पोषक तत्वांनी परिपूर्ण असावा. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीने समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात, आपण किवी, संत्रा, स्ट्रॉबेरी आणि इतर फळांसह प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. चव आणि आरोग्याने परिपूर्ण फळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. या 5 फळांचा आहारात जरूर समावेश करा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल.
संत्री - संत्री फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते आणि रक्त शुद्ध राहते. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बीची कमतरता देखील संत्री खाल्ल्याने पूर्ण होऊ शकते.
पेरू - पेरू हे अत्यंत स्वस्त आणि पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. एका मध्यम आकाराच्या पेरूमध्ये 200 ग्रॅम पोषक तत्वे असतात. पेरूमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात, ज्यामुळे ते वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. काही लोक पेरू सालासह खातात, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही पेरुची साल काढून खा.
पपई - पपई हे सर्व ऋतूत मिळणारे फळ आहे. पपई पचनासाठी उत्तम मानली जाते. पपई वजन कमी करण्यातही मदत करते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. एक कप पपई खाल्ल्याने तुम्हाला 88 मिलीग्रॅम पोषक तत्त्वे मिळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Coronavirus : WHO ने सांगितला कोरोनापासून वाचण्याचा डाएट प्लॅन, जाणून घ्या कोणते पदार्थ टाळावेत
- Whey Protein Benefits: इम्युनिटी वाढवण्यापासून ते मसल्सना मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे व्हे प्रोटीन, जाणून घ्या याचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha