Parents Tips : मुलाच्या चांगल्या विकासासाठी पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Parents Tips : मुलांच्या मानसिक विकासासाठी मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे.
![Parents Tips : मुलाच्या चांगल्या विकासासाठी पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला Parenting Tips these things are very important for physical and mental growth of your child marathi news Parents Tips : मुलाच्या चांगल्या विकासासाठी पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/17/e419d142c32ccb1f8466370b7212e0af1705498157626358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parenting Tips : सध्याच्या काळात लहान मुलांबरोबरच घरातील सदस्यांच्या लाईफस्टाईलमध्ये देखील बदल झाला आहे. पूर्वी मुलं बाहेर जाऊन खेळायची त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालीतही वाढ होत होती. यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा (Mental Health) देखील विकास होतो. पण, आजच्या मुलांची गोष्टच वेगळी आहे. मोबाईलमध्ये ते इतके दंग असतात की अभ्यासाकडे तर सोडाच पण जेवणातही त्यांचं लक्ष नसतं. या सर्वांचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर वाईट परिणाम होतो. जास्त वेळ मोबाईल वापरणे, कोणतीही कामे न करणे आणि नीट न खाणे यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मुलाच्या विकासासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
लसीकरण करा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या लसीकरणाची काळजी घेणे. वेळेवर लसीकरण करून मुलांना अनेक आजारांपासून दूर ठेवता येते. याबरोबरच मुलांच्या योग्य विकासासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
मुलांशी संवाद साधा
मुलांच्या मानसिक विकासासाठी मुलांशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मोकळ्या मनाने बोलावे. घरात असे वातावरण तयार करा, ज्यामध्ये मूल तुमच्याशी न घाबरता सर्व काही शेअर करू शकेल. जर मूल काही सांगत असेल तर त्याला बोलताना मध्येच अडवू नका तर त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका.
मुलांना प्रोत्साहित करा
अनेक वेळा मुलांच्या बाबतीत असं घडतं की त्यांना काहीतरी साध्य करायचं असतं पण वारंवार प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश मिळत नाही. अशा वेळी मुलांना समजावून सांगा की त्यांनी चुकांमधून शिकावे आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
शारीरिक हालचाली करा
आजकाल मुलं दिवसभर मोबाईल फोन वापरत असतात. जे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी चांगले नाही. म्हणून, आपल्या मुलाच्या योग्य विकासासाठी खेळ खेळणे खूप महत्वाचे आहे. यासाठीच त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा, ज्यामुळे मुलाचे मनोरंजन तसेच शारीरिक हालचाली देखील होतील.
मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्या
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलांच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष देणंं गरजेचं आहे. तुमच्या मुलाच्या वागण्यात अचानक काही बदल दिसला तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका. असे केल्याने तुमचे मूल गंभीर मानसिक समस्यांना बळी पडू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Parenting Tips : मुलं सांभाळून नोकरी करण्यात दमछाक होते ना? थांबा; 'या' तीन महत्वाच्या गोष्टी एका क्षणात सगळं सोपं करेल!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)