Parenting Tips : 'या' चुकांमुळे मुलं चिडचिड करतात; पालकांसाठी 'या' महत्त्वाच्या टीप्स
Signs of Stubborn Child : हट्टी मुलांसाठी जर एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो नकार ते पचवू शकत नाहीत.
Signs of Stubborn Child : प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना नेहमी आनंदी पहायचे असते, म्हणून ते मुलांना सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या मुलांना त्या सर्व सुविधा द्यायच्या आहेत ज्या त्यांना मिळू शकल्या नाहीत. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चुकीचा आहे, असे नेहमी म्हटले जाते. जर तुम्ही मुलांना प्रत्येक सुविधा दिली आणि त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला तर ते त्या गोष्टींना फारसे महत्त्व देत नाहीत. मुलांचं संगोपन करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांना प्रेम देण्याबरोबरच शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला मुलांचं संगोपन करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे सांगणार आहोत जेणेकरून तुमची मुलं चिडचिडी होार नाहीत.
'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या
1. एखाद्या गोष्टीचा नकार न पचवणे
हट्टी मुलांसाठी जर एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो नकार ते पचवू शकत नाहीत. कारण या मुलांनी लहानपणापासून कधीही नकार ऐकलेला नसतो. दुसरीकडे, आपण एखाद्या गोष्टीसाठी नकार दिल्यास, मुलाला राग येतो आणि मुलं चिडचिड करू लागतात.
2. पालन न करणे
लहानपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुमचे मूल अनेकदा मूलभूत गोष्टी करण्यास नकार देत असेल आणि तुम्ही त्याला किंवा तिला वेळीच रागावलात नाही तर तुमचे मूल हट्टी होते.
3. समाधानी नसणं
तुमचं काम फक्त मुलांना सुविधा देणं नसून त्यांना गोष्टींबद्दल कृतज्ञ राहायला शिकवणं ही तुमची जबाबदारी आहे. आपल्या मुलास चांगल्या सवयी शिकवल्याने मुलांचा समतोल राहतो. त्यामुळे ते कधीही अहंकारी होत नाही. दुसरीकडे, जर तुम्ही तुमच्या मुलांना या मूलभूत गोष्टी शिकवल्या नाहीत तर मुलं हट्टी होतात.
4. स्पोर्टिंग नसणं
खेळादरम्यान तुमचे मूल नेमके इतरांशी कसे वागते याचा अभ्यास तुम्हाला करता येऊ शकतो. अनेकदा मुलांना हार पचवता येत नाही. हरल्यानंतर वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. मात्र, त्यावेळी तुमचं मूल इतरांप्रती कसं वर्तन करतं तेही तितकंच महत्त्वाचं आहे.
मुलांना योग्य वळण कसं लावाल?
मुलाच्या वागण्याला पालक जितके जबाबदार असतात तितकेच ते मूल असते. जर पालकांना त्यांच्या मुलांना चांगले वळण लावायचे असेल तर काही गोष्टींवर त्यांना त्यांच्या मर्यादा पटवून द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलावर बंधने घालू लागाल तेव्हा ते शिस्तबद्ध होतील. त्यांच्यासमोर चांगले वातावरण तयार करा जेणेकरून ते तुमच्याकडून चांगल्या गोष्टी शिकतील. आजूबाजूच्या वातावरणातून मुलं खूप काही शिकतात. त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :