New Year Travel: ख्रिसमस, न्यू इअर सुट्टीसाठी 'ही' बजेट फ्रेंडली ठिकाणं अगदी परफेक्ट! शिमला.. मनाली विसराल...एकदा जाणून घ्याच...
New Year Travel: डिसेंबर महिना येताच ख्रिसमस, नववर्ष साजरे करण्याची तयारी सुरू होते. जर फिरण्याचा विचार करत असाल तर ही बजेट फ्रेंडली ठिकाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात.
New Year Travel: डिसेंबर महिना येताच अनेकांना वेध लागतात ते म्हणजे फिरायला जाण्याचे... ख्रिसमस आणि नववर्षाची तयारी देखील याच महिन्यात सुरू होते. गेल्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची हीच वेळ आहे. डिसेंबरच्या गुलाबी थंडीत लोक कुटुंब, मित्र किंवा जोडीदारांसह प्रवास करण्याचा प्लॅन करतात. तुम्हालाही या खास प्रसंगी कुठेतरी जायचे असेल, तर आत्तापासूनच तुमच्या सहलीचे नियोजन सुरू करा. आज आपण अशा 5 ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात. त्यामुळे यावेळी ख्रिसमस आणि नवीन वर्ष घरात नव्हे तर या खास ठिकाणी साजरे करा.
मसुरी- धनौल्टी
जर तुम्हाला थंड ठिकाण आणि बर्फवृष्टी आवडत असेल तर मसुरी हा एक उत्तम पर्याय आहे. डेहराडून ते मसुरीला बस किंवा टॅक्सी सहज उपलब्ध आहे. मॉल रोड, लाल टिब्बा आणि कंपनी गार्डन ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. धनौल्टी आणि सुरकंदा देवीची मंदिरेही मसुरीच्या थोडी पुढे आहेत. स्कूटी किंवा टॅक्सी भाड्याने घेऊन तुम्ही आरामात फिरू शकता.
नैनिताल
दिल्लीहून काठगोदाम आणि तिथून बसने ट्रेनने नैनितालला पोहोचता येते. नैनी तलावात बोटिंगचा आनंद घ्या. नैना देवी मंदिर आणि स्नो व्ह्यू पॉईंट देखील पाहण्यासारखे आहेत. हॉटेल्स आणि होम स्टे येथे स्वस्तात उपलब्ध आहेत, त्यामुळे हा प्रवास तुमच्या बजेटमध्ये राहील.
जैसलमेर
वाळवंटातील सौंदर्य आणि राजस्थानी संस्कृतीचा आनंद घ्यायचा असेल तर राजस्थानातील जैसलमेरला नक्की जा. सॅम सँड ड्युन्स, जैसलमेर किल्ला, गडीसर तलाव आणि पटवों की हवेली ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. उंट सवारी आणि जीप सफारी चुकवू नका. जैसलमेरची दोन दिवसांची सहल पुरेशी असेल.
चक्राता
जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जायचे असेल तर चक्राता योग्य आहे. डेहराडूनजवळ हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला टायगर फॉल्स, कनासर आणि बुधेर गुहा सारखी ठिकाणे पाहता येतील. डेहराडूनहून बस किंवा स्कूटर भाड्याने घेऊन तुम्ही येथे सहज पोहोचू शकता.
त्यामुळे यावेळी ख्रिसमस आणि नवीन वर्ष घरात नव्हे तर या खास ठिकाणी साजरे करा. थंड ठिकाणी जा किंवा वाळवंटाचा आनंद घ्या, ही सहल तुमचे वर्ष संस्मरणीय करेल. त्यामुळे उशीर करू नका, आतापासूनच नियोजन सुरू करा!
हेही वाचा>>>
New Year पार्टीसाठी गोव्याव्यतिरिक्त 'हे' 3 समुद्रकिनारे म्हणजे धम्माल! नववर्षाचे स्वागत ठरेल अविस्मरणीय, एकदा अनुभव घ्याच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )