एक्स्प्लोर

Navratri Recipe: नवरात्रीच्या उपवासात भूक लागणार नाही, वजन वाढणार नाही, एकदा 'ही' हाय प्रोटीन फास्टिंग रेसिपी ट्राय करा,

Navratri 2024 Recipe: नवरात्रीचा उपवास हा केवळ धार्मिक श्रद्धेसाठी नाही तर शरीर शुद्ध करण्याची एक चांगली संधी आहे. खास उपवास करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टने रेसिपी शेअर केलीय.

Navratri 2024 Recipe: शारदीय नवरात्र सुरू झाली आहे. अशात अनेकजण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात. सध्या देशात सर्वत्र देवीच्या भक्तीचे वारे वाहत आहेत. अशात अनेक भक्त मातेला प्रसन्न करण्यासाठी 9 दिवसांचे उपवास पाळतात. जर तुम्हीही उपवास करत असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच, सोबत भूकही लागणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदार्थामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करेल. जाणून घ्या...

न्यूट्रिशनिस्टने रेसिपी शेअर केली

नवरात्रीचा उपवास हा केवळ धार्मिक श्रद्धेसाठी नाही तर शरीर शुद्ध करण्याची एक चांगली संधी आहे. या काळात जास्त प्रमाणात मीठ, तेल किंवा कार्बोहायड्रेट वगैरे घेतले जात नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि त्याच वेळी शरीर डिटॉक्स होऊन शरीरात साचलेली घाणेरडी विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी नवरात्रीसाठी अशीच एक अप्रतिम रेसिपी सांगितली आहे, जी प्रोटीन म्हणजेच प्रथिनांनी समृद्ध आहे आणि तुम्ही उपवासातही खाऊ शकता. जाणून घ्या ही रेसिपी कशी तयार करावी? 

हाय प्रोटीन रेसिपीची 'अशी' तयारी करा

ही हाय प्रोटीन रेसिपी तयार करण्यासाठी तुम्हाला मखाणा, दही, चिया बिया, मनुका, डाळिंब, शेंगदाणे, सफरचंद आणि वेलची पावडर लागेल. एका मोठ्या भांड्यात एक कप दही घ्या. एक वाटी भाजलेले मखाणा, एक चमचा भिजवलेले चिया सीड्रस, 8 ते 10 सोनेरी मनुके, अर्धी वाटी डाळिंब, अर्धी सफरचंद, एक चमचा वेलची पूड आणि थोडे भिजवलेले शेंगदाणे घाला. सर्वकाही एकत्र मिसळा. तुमची हाय प्रोटीन फास्टिंग रेसिपी तयार आहे.

एमिनो ऍसिडची कमतरता भरून निघेल

मखाणा हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. यासोबतच ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक अमिनो ॲसिड्सही मुबलक प्रमाणात मिळतात. उपवासाच्या वेळी मखाणा वेगळेही खाता येतात.

पचन चांगले होईल

दह्यापासून शरीराला प्रोबायोटिक्स चांगल्या प्रमाणात मिळतात. दही पचनासाठीही उत्तम आहे. उपवासाच्या वेळी साधं दही खाऊ शकता, साखर किंवा दही असं एकत्र मिश्रणही खाऊ शकता 

पोषक तत्वांचे पॉवर हाऊस, भरपूर फायबर मिळेल

चिया सीड्सना पोषक तत्वांचे पॉवरहाऊस म्हणतात. कारण त्यात प्रथिनाशिवाय फायबरही मुबलक प्रमाणात असते. फायबरचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि उपवासात पुन्हा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही.

हेही वाचा>>>

Navratri 2024 Naivedya: नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या प्रिय 9 नैवेद्याची यादी! विविध नैवेद्याचे महत्त्व जाणून घ्या, सेव्ह करून घ्या..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
Weather Update : मुंबई, ठाणेसह कोकणाला 'यलो अलर्ट', वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता
आज पावसाचा 'यलो अलर्ट', मुंबई, ठाण्यात पावसाच्या सरी; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
Vasai Crime : पती आला तेव्हा तिच्यासोबत 'तो' होता, संतापलेल्या पतीनं पत्नीला ओढणीनं गळा आवळून संपवलं; त्यानंतर आजारपणानं मृत्यू झाल्याचा रचला बनाव
पती आला तेव्हा तिच्यासोबत 'तो' होता, संतापलेल्या पतीनं पत्नीला ओढणीनं गळा आवळून संपवलं; त्यानंतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Vidhan Sabha : लढायचं की पाडायचं? मनोज जरांगे आज जाहीर करणार भूमिकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 20 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 20 October 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
Weather Update : मुंबई, ठाणेसह कोकणाला 'यलो अलर्ट', वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता
आज पावसाचा 'यलो अलर्ट', मुंबई, ठाण्यात पावसाच्या सरी; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
Vasai Crime : पती आला तेव्हा तिच्यासोबत 'तो' होता, संतापलेल्या पतीनं पत्नीला ओढणीनं गळा आवळून संपवलं; त्यानंतर आजारपणानं मृत्यू झाल्याचा रचला बनाव
पती आला तेव्हा तिच्यासोबत 'तो' होता, संतापलेल्या पतीनं पत्नीला ओढणीनं गळा आवळून संपवलं; त्यानंतर...
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Embed widget