Navratri 2024 Fashion: गरबा नाईटला दिसाल परफेक्ट अन् सुंदर! 'या' ट्रेंडी हेअर स्टाईलने लागतील चार-चांद, नवरात्रीत सर्वांच्या खिळतील नजरा
Navratri 2024 Fashion: प्रत्येक मुलीला नवरात्री गरबा नाईटला सर्वात सुंदर आणि वेगळं दिसावं असं वाटतं. अशावेळी केवळ ड्रेसच नाही तर परफेक्ट हेअरस्टाइलही तुमचा संपूर्ण लुक खास बनवू शकते.
Navratri 2024 Fashion: ढोलीडा... ढम ढम ढोल बाजे.... नगाडे संग ढोल बाजे....अशी गरब्याची विविध गाणी सध्या आपल्या आजूबाजूस ऐकायला मिळत असतील. अवघ्या देशभरात शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या 9 दिवसात ठिकठिकाणी कुठे गरबा नाईट्स तर कुठे दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. जिथे अवघी तरूणाई या गरब्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. या कार्यक्रमात मुली त्यांच्या लुकबाबत खूप काळजी घेतात. कारण मुलींना गरबा खेळताना सर्वात सुंदर आणि वेगळं दिसावं असं वाटतं. मग केवळ ड्रेसच नाही तर परफेक्ट हेअरस्टाइलही तुमचा संपूर्ण लुक खास बनवू शकतो.
कोणत्याही क्लिप शिवाय हेअरस्टाईल कशी बनवायची?
या नवरात्रीत, हेअरस्टाईलमध्ये नवीन आणि रंगीत ट्विस्ट आणण्यासाठी रंगीबेरंगी रिबनचा वापर ट्रेंडमध्ये आहे. यामुळे तुम्हाला एक वेगळा आणि अनोखा लुक तर देईलच, पण तुमची गरबा नाईट अधिक स्टायलिश करेल. गरबा नाईटसाठी हेअरस्टाईलमध्ये काही वेगळं ट्राय करण्याचा विचार करत असाल तर रंगीत रिबन वापरू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष प्रोफेशनल टूल्सची आवश्यकता नाही. यासाठी सर्व प्रथम तुमचे केस नीट विंचरून घ्या आणि फ्रेंच वेणी, फिशटेल किंवा साधे पोनीटेल अशा कोणत्याही आवडत्या स्टाईलमध्ये बांधा. यानंतर केसांच्या मध्यभागी रंगीबेरंगी रिबन फिरवून बांधा.
गुजराती चनिया चोलीवर कोणती हेअरस्टाईल करावी?
जर तुम्ही गरबाच्या रात्री पारंपारिक गुजराती चनिया चोली किंवा लेहेंगा घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या रिबन्स वापरू शकता. यामुळे केसांना एक सुंदर रंगीत लूक देईल. पारंपारिक गुजराती चनिया चोली किंवा लेहेंग्याशी जुळल्यास ही स्टाईल खास आणि छान दिसते.
गरबा नाईट्ससाठी योग्य हेअरस्टाईल
हेअर स्टाईस एक्सपर्ट्स सांगतात, गरबा रात्रीसाठी रिबन हेअरस्टाईल योग्य असेल. हा केवळ पारंपारिक आणि आधुनिक ट्रेंडचा मिलाफच नाही, तर ते तुमच्या केसांना खराब होण्यापासून देखील वाचवते, कारण यामुळे तुमच्या केसांना दाबून किंवा घट्ट बांधण्याची गरज नाही. याशिवाय ही हेअरस्टाईल अतिशय सोपी आणि झटपट तयार होते. या नवरात्रीत, रंगीबेरंगी रिबनने तुमचे केस सजवा आणि गरबाच्या रात्री तुमचा पारंपारिक लुक पूर्णपणे नवीन आणि आकर्षक बनवा!
हेही वाचा>>>
Navratri 2024 Fashion : सुंदरा भरेल मनात! नवरात्रीला खास पारंपारिक लुकमध्ये दिसाल फॅशनेबल, 'ही' स्लीव्हलेस कुर्ती ट्राय करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )