(Source: ECI/ABP News/ABP Majha)
National Mountain Climbing Day 2024: जेव्हा 7 गिर्यारोहक आव्हानं पार करत चढले शिखर! संयम, जिद्दीची कहाणी, राष्ट्रीय गिर्यारोहण दिनानिमित्त जाणून घ्या याचे फायदे..
National Mountain Climbing Day 2024:राष्ट्रीय गिर्यारोहण दिन सुरुवातीची कहाणी खूप रंजक आहे. गिर्यारोहण हे केवळ तुमच्या शारीरिकच नव्हे तर तुमच्या मानसिक क्षमतेचीही चाचणी घेते.
National Mountain Climbing Day 2024 : एखादा डोंगर किंवी पर्वतावर चढणे म्हणजे सोप्प नाही... ज्यालाच गिर्यारोहण असेही म्हणतात. ही एक कला म्हटली तर अयोग्य ठरणार नाही. एक साहसी, कठीण आणि अत्यंत कार्यक्षमतेचा खेळ म्हटला जाऊ लागला असल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अखिल भारतीय क्रीडा मंडळानेही त्यास एक क्रीडाप्रकार म्हणून रीतसर मान्यता दिली आहे. राष्ट्रीय पर्वतारोहण दिन दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना पर्वतारोहणाचे महत्त्व तसेच पर्वतांच्या सुरक्षिततेची जाणीव करून देणे हा आहे. हा दिवस अमेरिकेत साजरा केला जातो. गिर्यारोहण हे एक साहस आहे जे केवळ तुमच्या शारीरिकच नव्हे तर तुमच्या मानसिक क्षमतेचीही चाचणी घेते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर
राष्ट्रीय गिर्यारोहण दिन दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना गिर्यारोहणसाठी प्रवृत्त करणे आणि या साहसाबद्दल जनजागृती करणे हा आहे. गिर्यारोहण ही केवळ साहसी क्रिया नाही तर ती शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याशिवाय संघकार्य, संयम, जिद्द या गुणांचाही विकास होतो. गिर्यारोहणात दहा-पंधरा मीटर उंचीची टेकडी चढण्यापासून ते माऊंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर चढण्यापर्यंतचे सर्व प्रकार येतात. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची, कुशलतेची व योग्य त्या साधनसामग्रीची आवश्यकता असते. या गोष्टींच्या अभावी गिर्यारोहण घातक ठरण्याचा संभव असतो. हा दिवस साजरा करायला कशी सुरुवात झाली? ते जाणून घेऊया.
राष्ट्रीय गिर्यारोहण दिनाची सुरुवात कशी झाली?
राष्ट्रीय गिर्यारोहण दिवसाची सुरुवात युनायटेड स्टेट्समध्ये झाली. हा दिवस भारतीय पर्वतारोहण संघटनेने प्रस्तावित केला होता. हा दिवस 1 ऑगस्ट 1898 रोजी ग्रँड टेटनच्या पहिल्या यशस्वी चढाईची आठवण करून देतो. ग्रँड टेटन हे वायोमिंगच्या रेंजमधील सर्वोच्च शिखर आहे आणि जे एका टीम म्हणजेच संघाने चढले होते. या संघात एकूण सात गिर्यारोहक होते, ज्याचे नेतृत्व नॅथॅनियल नाट लँगफोर्ड करत होते. त्याच्याशिवाय या संघात टीएम बॅनन, जेपी क्रेमर, जॉन शिवे, फ्रँक स्पाल्डिंग, विल्यम ओवेन आणि फ्रँकलिन स्पाल्डिंग यांचा समावेश होता.
अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते
गिर्यारोहणाचे एक-दोन फायदे नाहीत तर अनेक फायदे आहेत. हे करण्याआधी काही तयारी करावी लागते, ज्यामध्ये व्यायाम ही पहिली गोष्ट आहे, ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. गिर्यारोहण करताना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे लोकांची सांघिक कार्याची समज वाढते, त्यांची मानसिक क्षमता आणि धैर्य याची जाणीव होते. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गिर्यारोहणाची जास्तीत जास्त माहिती लोकांमध्ये पोहोचवणे.
हा दिवस कसा साजरा केला जातो?
गिर्यारोहणाशी संबंधित हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. गिर्यारोहकांचा गौरव केला जातो. त्यांचा प्रवास आणि त्यात आलेली आव्हाने याबद्दल बोलले जाते.
हेही वाचा>>>
Friendship Day च्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम! भारतात कधी साजरा केला जातो हा दिवस? गूगलवर सर्वाधिक सर्चिंग
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )