(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सकाळच्या 'या' सवयी तुमच्या आरोग्यासाठी ठरतात घातक; आजच बदला
Morning Health Tips : जर दिवसाची सुरुवातच चुकीची झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. या सवयींमुळे तुमची संपूर्ण दिनचर्या बिघडू शकते.
Morning Health Tips : तुमची सकाळ जर चांगली गेली तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो असे अनेकदा म्हटले जाते. जर तुमच्या दिवसाची सुरुवात चुकीची झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो. यासाठीच शरीर प्रसन्न करण्यासाठी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुमच्या दिनक्रमात काही बदल करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या दिनक्रमात काही गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमची सकाळ प्रसन्न होईल. या सवयी कोणत्या आहेत. ते जाणून घ्या.
'या' सवयी तुमच्या दिवसावर करतात परिणाम :
1. जास्त वेळ झोपणे : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. रोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्ही बराच वेळ झोपलात तर तुमची दिवसभराची दिनचर्या बिघडते. अशा स्थितीत नाश्ता आणि जेवण उशिराने होते. ज्यामुळे तुमच्या चयापचयवर परिणाम होतो. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, जे लोक 9 ते 10 तास झोपतात त्यांच्यात लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते.
2. व्यायाम न करणे : जर तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर सकाळी उठून व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. जरी तुम्ही 10 ते 15 मिनिटे हे केले तरी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चरबी वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होऊ शकते.
3. पाणी न पिणे : सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते, जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही सर्वात मोठी चूक करता आहात. कारण पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यापासून कॅलरी बर्न करण्यास मदत करते. पाणी न पिल्याने चयापचयाची समस्या निर्माण होऊ शकते आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. म्हणूनच दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करणे चांगले मानले जाते.
4. साखरेचा चहा पिणे : अनेकदा आपल्या दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने होते. पण जर आपण सकाळी लवकर उठून साखरयुक्त चहा-कॉफीचे सेवन केले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. साखरयुक्त चहा वजन वाढवण्यास मदत करू शकते.
5. Unhealthy अन्न खाणे : तुमचा सकाळचा नाश्ता अतिशय साधा आणि प्रथिनांनी भरलेला असावा. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात जंक फूड किंवा जास्त तेलकट मसालेयुक्त पदार्थ खात असाल तर ते तुमच्या शरीरातील चरबी वाढविण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला दिवसभर सुस्तीही येऊ शकते.
6. जेवताना टीव्ही पाहणे : अनेकांना नाश्ता आणि जेवताना टीव्ही समोर हवा असतो. मात्र, असे केल्याने खाल्लेले अन्न तुमच्या शरीराला नीट लागत नाही. त्यामुळे जेवताना टीव्ही पाहणे टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :