एक्स्प्लोर

Health Tips : थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी 'हे' 5 पदार्थ नेहमी जवळ ठेवा; दिवसभर उत्साही राहाल

Health Tips : काम करताना अचानक थकल्यासारखे वाटल्यास झटपट एनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचे सेवन करू शकता.

Health Tips : शरीर सक्रिय आणि निरोगी ठेवण्यासाठी ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. शरीरात पुरेशी उर्जा असेल तर आपण सर्व कामे करू शकतो. दुसरीकडे, जर ऊर्जा पातळी कमी झाली, तर आपल्याला थकवा जाणवतो. अनेकवेळा अचानक शरीरातील एनर्जी लेव्हल कमी होते आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही. कारण आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो. अनेक वेळा अति शारीरिक हालचालींमुळेही आपल्याला थकवा जाणवतो.

दिवसभर शरीर निरोगी आणि ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यासाठी आपण आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. काम करताना किंवा धावपळीत थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळविण्यासाठी या 5 गोष्टींचे सेवन करा. 

1. बदाम खा : बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. झटपट एनर्जीसाठी बदाम उत्तम मानले जाते.

2. केळी : झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करू शकता. तुम्ही मुलाच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा ऑफिसला जाणार्‍या व्यक्तीच्या जेवणाच्या डब्यातही केळी देऊ शकता. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा केळी खा, यामुळे तुमची एनर्जी लेव्हल लगेच वाढेल. केळीमध्ये व्हिटॅमिन बी, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

3. हर्बल चहा किंवा कॉफी प्या : शरीराला झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही हर्बल चहा किंवा कॉफीचे सेवन करू शकता. वास्तविक, कॉफीमध्ये कॅफिन आढळते जे तुम्हाला सतर्क करते.

4. लिंबूपाणी : जर तुम्हाला अचानक थकवा किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबाच्या पाण्यात चिमूटभर मीठ आणि साखरही टाकू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखले जाईल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. 

5. पाणी किंवा हंगामी फळं खा : काही वेळा पाणी कमी प्यायल्याने थकवा जाणवतो. पाणी हा ऊर्जा मिळवण्यासाठी चांगला स्त्रोत मानला जातो. याशिवाय हंगामी फळांचे सेवन करूनही तुम्ही झटपट ऊर्जा घेऊ शकता. हंगामी फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे जळजळ दूर करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget