Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू जास्त प्रमाणात खाताय? वेळीच काळजी घ्या; होतील गंभीर परिणाम
Sesame Seeds Side Effect : तिळाचे लाडू आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
![Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू जास्त प्रमाणात खाताय? वेळीच काळजी घ्या; होतील गंभीर परिणाम Makar Sankranti 2023 sesame seeds side effects do not consume too much sesame seeds marathi news Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू जास्त प्रमाणात खाताय? वेळीच काळजी घ्या; होतील गंभीर परिणाम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/3809b57beebdd31389f3f2654e4f95171673698890481358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sesame Seeds Side Effect : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) सणाला जवळपास सुरुवात झाली आहे. या निमित्ताने घराघरांत तिळाचे लाडू, चिक्की असे अनेक पदार्थ बनवले जात आहेत. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी तीळ फायदेशीरच आहे. मात्र, तिळाचे लाडू किती प्रमाणात खावे हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्यास शरीरात अॅनाफिलेक्सिसची समस्या सुरू होते. तिळाची अॅलर्जी होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे रक्तदाबही झपाट्याने कमी होतो तसेच, श्वासोच्छवासाची नळीही आकुंचन पावू लागते.
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेले लाडू खाण्याची प्रथा आहे. या दिवशी लोकांना तीळ आणि गुळाचे लाडू, चिक्की, मिठाई खायला प्रचंड आवडते. तिळामध्ये असे अनेक फायदेशीर गुणधर्म आढळतात जे हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहित आहे का की तिळाचे लाडू जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरात इतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तिळाचे लाडू जास्त खाल्ल्याने त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो, असे संशोधनातून समोर आले आहे. तसेच अॅलर्जीमुळे श्वसनाचा त्रासही होऊ शकतो.
श्वास घेण्यास अडचण :
स्टाइलाइजच्या मते, तिळाचे लाडू जास्त प्रमाणात खाल्ल्याने अॅनाफिलेक्सिसची समस्या सुरू होते. जेव्हा तुमच्या पांढऱ्या रक्त पेशी शरीरात जास्त प्रमाणात रसायने बनवू लागतात तेव्हा ही समस्या सुरू होते. याला केमिकल अॅनाफिलेक्टिक शॉक म्हणतात. यामुळे, रक्तदाब झपाट्याने कमी होतो. आणि श्वासोच्छवासाच्या नळीमध्ये आकुंचन होते. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऍलर्जी अस्थमा आणि इम्युनोलॉजीच्या मते, ऍनाफिलेक्सिसवर वेळेवर उपचार न केल्यास, यामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
तिळाची ऍलर्जी (अॅनाफिलेक्सिसची लक्षणे) :
- श्वासोच्छवासास त्रास
- खोकल्याचा त्रास
- मळमळ होते
- पोटदुखीचा त्रास
- उलट्या होतात
- तोंडात खाज येते
- चेहऱ्याचा रंग बदलतो
'अशा' प्रकारे स्वतःचं रक्षण करा
- जर तुम्हाला तीळाची कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर तुम्ही चुकूनही अशा गोष्टी खाऊ नयेत. ज्यामध्ये तीळ आहे. जसे- तीळ, तिळाचे तेल इ.
- ज्यांना बीपीचा आजार आहे त्यांनी तीळ खाणे टाळावे.
- जर तुम्ही नुकताच बाळाला जन्म दिला असेल तर कच्चे तीळ खाणे टाळा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)