एक्स्प्लोर

Health Tips : तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराबरोबरच 'ब्रेन डिटॉक्स' का आवश्यक आहे? जाणून घ्या सविस्तर

Health Tips : अतिविचार किंवा तणावामुळे मनःशांतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्वत:साठी वेळ काढून ब्रेन डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे.

Brain Detox : बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे, आपल्याला माहित नाही की आपल्या शरीरात किती विषाणू आणि बॅक्टेरिया तयार होतात, त्यांना बाहेर काढण्यासाठी, आपण अनेकदा शरीर डिटॉक्स करत राहतो. मात्र, शरीराबरोबरच मेंदूही detoxified करणे गरजेचे आहे. सध्याच्या जीवनशैलीत मन निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण जास्त विचार करणे, ताण घेणे तुमच्या मनासाठी आणि शरीरासाठी हानिकारक असू शकते. अतिविचार किंवा तणावामुळे मनःशांतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्वत:साठी वेळ काढून ब्रेन डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. असे केल्याने थकवा, चिंता, नैराश्य यांसारख्या समस्येवर मात करता येते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी तुम्ही वेळोवेळी ब्रेन डिटॉक्स करावे. ब्रेन डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतींचा अवलंब करू शकता.

1. पुरेशी झोप घ्या : निरोगी शरीर आणि मनासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. शरीराला किमान 6 ते 8 तासांची झोप मिळणे गरजेचे आहे. जर तुम्ही ब्रेन डिटॉक्ससाठी योग्य झोप घेत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.

  • रूममध्ये अंधार करून झोपा.
  • चांगल्या झोपेसाठी आवाज टाळा.
  • झोपण्यापूर्वी तुम्ही आंघोळ करून शांत झोपू शकता.
  • झोपण्यापूर्वी हलका व्यायाम करा.

2. योग्य आहार घ्या : रात्री झोपताना तुमचं पोट बिघडवणारे पदार्थ खाऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी हे पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा.

  • मसालेदार अन्न टाळा.
  • कॅफिनचा वापर टाळा.
  • दारूचे सेवन टाळा.

3. योगा करा : योगा केल्याने मनातील अनेक प्रकारचे तणाव दूर होण्यास मदत होते. योग आणि व्यायाम तुम्हाला तणावाचा सामना करण्यास मदत करू शकतात. यामुळे तुम्हाला शरीरात ऊर्जाही जाणवेल. उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे मेंदूच्या आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होऊ शकतो. जसे की मेंदूला रक्त प्रवाह वाढवण्यास मदत होते.

4. मेंदूचा व्यायाम करा : स्ट्रॉंग मनासाठी मेंदूचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. शारीरिक हालचालींमुळे तुमच्या मेंदूच्या विकासात मदत होते, पण मानसिक क्रिया तुमच्या मेंदूच्या स्नायूंना बळकट करते. मेंदूच्या व्यायामासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता

  • कोडी सोडवणे.
  • संगीत ऐकणे.
  • नवीन भाषा शिकणे.
  • स्वतःला हायड्रेट ठेवणे.

5. टीव्ही आणि मोबाईलपासून अंतर ठेवा : या सर्व गॅझेट्सचा कमीत कमी वापर करा आणि त्यासाठी वेळ काढून तुमच्या आवडत्या शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करा

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget