(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kinkrant 2023 : संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
Kinkrant 2023 : दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात.
Kinkrant 2023 : मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण सगळीकडे आनंदाने आणि उत्साहात साजरा झाला. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्सुकता पाहायला मिळाली. मात्र, खूप कमी लोकांना माहित आहे की, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत (Kinkrant 2023) साजरी केली जाते. अनेकांना किंक्रांत या शब्दाचा अर्थ काय? या सणामागील महत्त्व काय याबाबत कल्पना नाहीये. या माध्यमातून किंक्रांत म्हणजे काय याबाबत जाणून घेऊयात.
...म्हणून किंक्रांत साजरा करतात
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल'
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो.
पंचागात हा दिवस करिदिन
पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये, भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती खावी, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी-कुंकू करावे अशा काही प्रथा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात.
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (Bhogi), मकरसंक्रांती (Makar Sankranti), किंक्रांत (Kinkrant) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.
महत्त्वाच्या बातम्या :
Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातला पहिलाच सण म्हणजे 'मकरसंक्रांत'; वाचा या दिनाचं पारंपरिक महत्त्व