International Non-violence Day : अति रागामुळे तुमच्या कामावर परिणाम होतोय? 'असा' ठेवा तुमच्या रागावर ताबा
International Non-violence Day : जास्त रागामुळे आपण इतरांपेक्षा स्वतःचेच जास्त नुकसान करतो. एकदा राग व्यक्त केल्यानंतर शेवटी पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.
International Non-violence Day : आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जयंती. महात्मा गांधी यांना अहिंसेचे पुजारी मानले जात होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसेचा मार्गही निवडला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. खरंतर, राग येणं हे साहजिक आहे, पण जास्त राग येणं आपल्यासाठी नुकसानकारक असू शकते. जास्त रागामुळे आपण इतरांपेक्षा स्वतःचेच जास्त नुकसान करतो. एकदा राग व्यक्त केल्यानंतर शेवटी पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. यासाठीच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.
विचारपूर्वक बोला
रागाच्या भरात काहीही बोलल्याचा नंतर पश्चाताप होतो. रागाच्या भरात बोललेल्या तुमच्या शब्दांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा बोलण्यापूर्वी विचार करा किंवा रागात बोलू नका.
विश्रांती घ्या
जेव्हा राग येतो तेव्हा आपण काय बोलतो किंवा करतो हे आपल्याला अनेकदा समजत नाही, ज्यामुळे आपल्याला अनेकदा विपरीत परिणाम भोगावे लागतात. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचा राग तुमच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे, तेव्हा थोडा वेळ शांततेत रहा. फिरायला जा किंवा शांतपणे कुठेतरी बसा. यामुळे तुमचं मन शांत होईल.
व्यायाम करा
व्यायामामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि तुमची तणावाची पातळीही कमी राहते. त्यामुळे तुम्हाला राग कमी येतो. व्यायामामुळे झोपही सुधारते. यामुळे देखील राग नियंत्रणात राहतो.
ट्रिगर ओळखा
प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाचा स्वभावही वेगळा असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला कशामुळे राग येतो ते ओळखा. कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात हे ओळखल्यानंतर त्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या भावना व्यक्त करा
राग येण्याचे एक कारण म्हणजे मनात दडपलेल्या गोष्टी असू शकतात. म्हणून, जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटत असेल तेव्हा विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्याशी बोला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे विचार तुमच्या डायरीतही लिहू शकता. यातूनही तुमच्या भावना व्यक्त होतील.
थेरपीची मदत घ्या
सर्व उपाय करूनही तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही काऊंन्सिलिंगची मदत घ्या. ते तुम्हाला तुमच्या रागाची समस्या समजून घेण्यास मदत करू शकतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग सुचवू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Facial Yoga benefits : सुंदर आणि तरूण त्वचेचं रहस्य आहे फेशियल योगा; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत