एक्स्प्लोर

International Men's Day | जागतिक पुरुष दिवस; इतिहास, थीम सर्वकाही!

जागतिक महिला दिवस कधी असतो याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण जागतिक पुरुष दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागेल किंवा माहितही नसेल. 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचा इतिहास, थीम सर्वकाही!

मुंबई : जागतिक महिला दिवस कधी असतो याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण जागतिक पुरुष दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागेल किंवा माहितही नसेल. जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजेत आज जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येत आहे. समाजात फक्त महिलाच नाही, ज्यांच्यावर अत्याचार होतो. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेक पीडित पुरुषही दिसतील. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये पहिला पुरुष दिन साजा करण्यात आला. भारतात त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. 'पुरुष आणि मुलांचे उत्तम आरोग्य' ही यंदाच्या पुरुष दिनाची थीम आहे.

पुरुष दिनाचा इतिहास 1923 मध्ये काही पुरुषांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या धर्तीवर 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. यानंतर 1968 मध्ये अमेरिकेतील पत्रकार जॉन पी. हॅरिस यांनी एका लेखात म्हटलं होतं की, सोव्हिएत प्रणालीत संतुलनाची कमतरता आहे. ही प्रणाली महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरी करते, पण पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारचा दिवस साजरा केला जात नाही. यानंतर 19 नोव्हेंबर 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी पुरुषांचं योगदान मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हापासून 19 नोव्हेंबरला संपूर्ण जगात त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो.

अशाप्रकारे साजरा करा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस परदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. भारतात आता कुठे या दिवसाला प्रसिद्धी मिळाली आहे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातून करा. घरातील पुरुष सदस्यांना ते खास असल्याची जाणीव करुन द्या. त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा, गिफ्ट द्या किंवा छान मेसेज असलेलं कार्ड देऊनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget