Important days in 3rd April : 3 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
Important days in 3rd April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. त्यानुसार प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
Important days in 3rd April : एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. अशा वेळी प्रमुख सण कोणत्या दिवशी आहेत, सामाजिक आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला या दिनविशेषच्या माध्यमातून देणार आहोत. त्यानुसार जाणून घ्या 3 एप्रिलचे दिनविशेष.
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे 1680 साली स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर निधन झाले.
बॉलिवूड अभिनेत्री जयप्रदा यांचा वाढदिवस
सिने अभिनेत्री जयप्रदा यांचा 3 एप्रिल 1962 रोजी आंध्रातील राजाहमुंडरी येथे जन्म झाला. जयप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी असे आहे. 'भूमिकोसम' हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमानंतर त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली.
भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक प्रभु देवा यांचा वाढदिवस
प्रभु देवा हे भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते आहेत. सन 1955 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
इ.स. 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत पाक्षिक केले सुरू
इ.स. 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक काढले. या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते. या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित असत. पण आर्थिक अडचणींमुळे बहिष्कृत भारत 15 नोव्हेंबर 1929 रोजी बंद पडले.
गोटिलीप डाईमला यांना इंजिन रचनेचं पेटंट मिळालं
इ.स. 1885 साली वेगवान पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या गोटिलीप डाईमला यांना इंजिन रचनेचं पेटंट मिळालं.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरीताई आमोणकर पुण्यतिथी
भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये किशोरीताई आमोणकर यांची गणना होते. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल किशोरीताईंना 1987 मध्ये पद्मभूषण आणि 2002 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
भारताचा पहिला अवताश यात्री राकेश शर्मा यांची अंतराळ प्रवासास सुरुवात
राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमे अंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली आणि ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. ते जवळपास 21 तास आणि 40 मिनिटे अंतराळात वावरले.
टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर
2010 साली अॅपल कंपनीने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती केली जाहीर केली.
संबंधित बातम्या
Important days in 2nd April : 2 एप्रिल दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनांचा आढावा
Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
Indian National Calendar 2022 : राष्ट्रीय कॅलेंडरनुसार आज आहे वर्षाचा पहिला दिवस, भारतीय नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha