Diabetes Control Diet : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनियमित जेवणामुळे अनेक आजारांचा धोका वाढला आहे. त्यातलाच मधुमेह हा सुद्धा असा एक रोग आहे ज्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची जीवनशैलीच आहे. विशेष म्हणजे मधुमेह हळूहळू तुमच्या शरीरातील इतर अवयवांनासुद्धा प्रभावित करतो म्हणूनच मधुमेहाला सायलेंट किलर म्हटलं जातं. तुम्हाला जर मधुमेह झाल्यास तुमचे डोळे, किडनी, यकृत, हृद्य आणि तुमच्या पायांना त्रास होऊ लागतो. सुरुवातीला हा आजार वयाच्या 40व्या वर्षी व्हायचा परंतु आता लहान मुलांमध्येदेखील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसतेय. 
 
मधुमेहाच्या डाएटसाठी या फळांचा आणि पालेभाज्यांचा करावा आहारात समावेश -


1. हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables)- मधुमेह झाल्यास हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. पालक, दुधी, पानांच्या भाज्या आणि ब्रोकली यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी या पालेभाज्या खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' मोठ्या प्रामणात आढळून येते तसेच कॅलरीजचे प्रमाणही फार कमी असते. ब्रोकली ही मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर तर आहेच पण त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठीसुद्धा ही भाजी फायदेशीर आहे. 


2- भेंडी (Ladyfinger)- मधुमेहाच्या रूग्णांसाठी भेंडी हा एक उत्तम पर्याय आहे. भेंडीत फायबरचे प्रमाण अधिक असते तसेच भेंडी पचनासाठीही उत्तम ठरते. भेंडीमुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. भेंडीत समावेश असलेले पोषक तत्व इंन्सुलिनच्या वाढीकरता फायदेशीर ठरतात. भेंडीमध्ये एन्टीऑक्साईडचे प्रमाण असते जे तुमच्या शरीराला इतर आजारापासून बचाव करतात. 


3- गाजर (Carrot)- गाजरमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'ए' आणि खनिजांचा समावेश असतो. मधुमेहाच्या रूग्णांनी गाजराचा आहारात नक्की समावेश करावा. अशा रूग्णांनी भाज्यांव्यतिरिक्त सलादच्या माध्यामातून कच्चं गाजर खाल्ल्यास ते अधिक फायदेशीर ठरतं. गाजरात फायबरचे प्रामण अधिक असते यामुळे शरीरात हळूहळू मधुमेह कमी होतो. 


4- कोबी (Cabbage)- कोबीसु्द्धा मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. कोबीमध्ये पिष्टमय पदार्थाचे (स्टार्च) प्रमाण फार कमी असते. कोबीत एन्टीऑक्सीडेन्ट्स आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि फायबर असते. मधुमेहाचे रूग्ण सलाद किंवा भाजीच्या  माध्यमातून ही भाजी खाऊ शकता. 


5-काकडी (Cucumber)-  काकडी खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरचा समावेश असतो. उन्हाळ्यात काकडीचे अधिक फायदे आहेत. काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक असते. वजन कमी करण्य़ासाठीसुद्धा काकडी खूप फादेशीर ठरते. तसेच पोटाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठीसुद्धा काकडीचा विशेष उपयोग होतो. 


6-सफरचंद (Apple)- सफरचंद शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. मधुमेहाच्या रूग्णांसाठीदेखील सफरचंद फायद्याचे आहे. सफरचंद खाल्ल्याने पोट साफ होते आणि वजनही कमी करण्यास मदत होते. 


7- संत्र (Orange)- फळांमध्ये संत्र्यांना सुपरफूड मानले जाते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी तर संत्र खूप फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन 'सी' आणि पोटॅशियम असते ज्यामुळे मधुमेह नियंत्रणासाठी विशेष फायदा होतो. 


8- पेरू (Guava)- पेरू हा स्वस्त आणि शरीरासाठी विशेष फायदेशीर आहे. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक निर्देशांक असतो. ज्यामुळे मधुमेह निय़ंत्रणासाठी त्याचा उपय़ोग होतो. पेरूत व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'ए' आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्व असतात. 


9- कीवी (Kiwi)- किवी चवीला खूप स्वादिष्ट असतात. किवीचे वैशिष्ट्य म्हणजे ही बाजारात बाराही महिने उपलब्ध असते. किवीत व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' भरपूर प्रमाणात असतात. किवीमुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha