Weight Loss Diet : फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. काही लोक वेगवगेळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं  असेल तर तुम्ही या फळांचा समावेश डाएटमध्ये केला पाहिजे.


संत्री (Orange)
संत्रीचे ज्यूस दररोज सकाळी ब्रेकफास्ट करताना तुम्ही प्यावे. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहिल. तसेच रोज 2 संत्री देखील तुम्ही खाऊ शकता. 


सफरचंद (Apple)
सफरचंद या फळामध्ये पॉलीफिनोल्स असते. ज्यामुळे वजन कमी होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश केला पाहिजे. 


अननस (Pineapple)
अननस या फळामध्ये गॅलिक अॅसिड असते. या अॅसिडमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. त्यामुळे जर तुम्ही रोज 123 ग्राम अननस खाल्ले तर तुमचे वजन झटपट कमी होईल.


पपई  (Papaya)
पपईमध्ये असणाऱ्या अँटिओबेसिटी या गूणामुळे वजन कमी होते.  


वजन कमी करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या ज्यूसचा आहारात समावेश करू शकता.भोपळ्याचा ज्यूस तयार करण्यासाठी भोपळ्याला किसून घ्या. भोपळा किसल्यानंतर तो ज्यूस एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दररोज सकाळी अनोशापोटी हा ज्यूस प्या. 


वजन कमी करण्यासाठी शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर महत्वाच्या बातम्या-


Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत


Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha