Health benefits of Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट हे फळ म्हणजे आरोग्याचा खजिना आहे. हे अत्यंत महागडे फळ असून सर्वत्र सहजासहजी मिळत नाही. मात्र त्याचे फायदे बरेच आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि भरपूर फायबर आढळतात. हे फळ मधुमेह, हृदय आणि कर्करोग यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करते. ड्रॅगन फ्रूटमध्ये लाइकोपीन आणि बीटा कॅरोटीन असते, ज्यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोरोनाच्या काळात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये भरपूर आयर्न आढळते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. जाणून घ्या ड्रॅगन फ्रूटचे काय फायदे आहेत.


ड्रॅगन फ्रूटचे फायदे


1. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर     
ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात, त्यात फ्लेव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर तुम्हांला मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचा आहारात समावेश करू शकता.


2. हृदयासाठी फायदेशीर       
ड्रॅगन फ्रूटमध्ये लहान काळ्या बिया असतात. या बियांमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी अॅसिड्स आढळतात. यामुळे तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत होते.


3. प्रतिकारशक्ती वाढवते
ड्रॅगन फ्रूट तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. तसेच, तुम्ही अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करू शकता.


4. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते
ड्रॅगन फ्रूट बेड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.


5. पचन व्यवस्थित ठेवते
ड्रॅगन फ्रूट पोटाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. त्यामुळे पोट आणि आतड्यांमधील चांगले मायक्रोबायोम वाढते, त्यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधीचे विकार दूर होतात. या फळामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.


6. हाडे मजबूत बनवते
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत होतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स देखील संधिवात आराम देतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha