Winter Skin Care :हिवाळ्यामध्ये (Winter Season)  त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे  त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes)आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. जर तुम्हाला मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही दूध चेहऱ्यावर लावावे. दूध चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम होईल. त्यासाठी तुम्हाला दुधापासून तयार करण्यात आलेल्या या फेस पॅकचा वापर करावा लागेल. 


एका वाटीत 2 ते 3 चमचे कच्चे दूध घ्या. त्यानंतर कापसाच्या बोळ्याने हे दूध चेहऱ्यावर लावा. 10 मिनीटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.  मुलतानी माती किंवा गुलाब पाणी चेहऱ्यावर लावताना देखील तुम्ही त्यामध्ये दूध मिक्स करू शकता. 


हळद आणि दुधाचा फेस पॅक 
हळद आणि दुध मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. दूध आणि हळदची ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा 20 मिनीटांनंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात आणि त्वचा तजेलदार  होते.


दुधाचे फायदे-
दुधामध्ये असणारे लेक्टिक अॅसिड स्किनमधील सेल्सला हेल्दी ठेवतात. तसेच त्वचेमधील मेलेनिनच्या प्रॉडक्शनला संतुलित ठेवण्याचे काम दूध करते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तसेच डेड स्किन घालवण्यासाठी चेहऱ्याला दूधा लावावे. 


टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.  


इतर बातम्या :


Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत


Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अ‍ॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha