एक्स्प्लोर
बद्धकोष्ठ दूर करण्याचे घरगुती उपाय
आपल्या शरीराला लावलेली सवय आणि दिनचर्या पोट साफ होण्याला किंवा न होण्याला कारणीभूत ठरते. बद्धकोष्ठ हा बहुतांश वेळा चुकीच्या आहार-विहाराच्या सवयींचा परिणाम असतो.

फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
मुंबई : दिवसातून एकदा पोट नियमितपणे साफ होणं, हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम इतक्याच काळाचा असतो. या कालावधीत अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणं चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. आपल्या शरीराला लावलेली सवय आणि दिनचर्या पोट साफ होण्याला किंवा न होण्याला कारणीभूत ठरते. बद्धकोष्ठ हा बहुतांश वेळा चुकीच्या आहार-विहाराच्या सवयींचा परिणाम असतो. बद्धकोष्ठामुळे मळ कोरडा होऊन खडे तयार होतात. त्यामुळे मळ बाहेर पडायला अवघड जाते. बद्धकोष्ठ दूर करण्याचे घरगुती उपाय 1. बद्धकोष्ठाची समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू आणि एरंडेल तेल एकत्र करुन घ्यावं. सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून ते प्यावे. त्यामुळे ही समस्या हळूहळू दूर होत जाते. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एरंडेल तेल मिसळून प्यावं. त्यामुळे सकाळी पोट सहज साफ होतं. 2. रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा मध टाकून घ्यावं. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते आणि आपले पोटही निरोगी राहते. 3. गरम पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून प्यावे. त्यामुळे पोटाची समस्या दूर होते. 4. त्रिफळा पाण्यात टाकून पाणी उकळावे. त्यानंतर पाणी थंड करुन ते प्राशन करावे. हा पोटासाठी रामबाण उपाय आहे. 5. पपई खाणं पोटासाठी फायदेशीर आहे. पपईने पोट साफ राहतं. यात व्हिटॅमिन डी भरपूर असल्यामुळे दररोज शिजवलेले पपई खावेत 6. अंजीर पाण्यात टाकून नंतर खा. अंजीर दुधासोबतही खाण्याचाही पर्याय आहे. तुमची बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. 7. आपल्या आहारात पालकाचा समावेश असणं गरजेचं आहे. पालकाची भाजी किंवा सूप पिणं उपयुक्त ठरतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























