Holi 2024 : होळी Enjoy करा, पण चुकूनही 'हे' काम करू नका; त्वचा, केस, नखांसाठी महागात पडू शकते.
Holi 2024 : होळीच्या उत्साहात आपली त्वचा, केस, नखे यांचे काही नुकसान तर होत नाही ना? याची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या
Holi 2024 : होळीचा (Holi 2024) उत्साह भरपूर असतो. कारण ज्या दिवसाची आपण आतुरेतेने वाट पाहत असतो, तो दिवस जेव्हा येतो, तेव्हा आपण सर्व भान विसरून होळी, रंगपंचमी (Rang Panchami 2024) खेळतो, एकमेकांवर रंगांची उधळण करतो. पण या उत्साहाच्या भरात आपली त्वचा, केस, नखे यांचे काही नुकसान तर होत नाही ना? याची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या सविस्तर..
अवयवांची काळजी घ्या
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक ब्रँडची उत्पादने वापरतो. या सर्व उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक गोष्टी जास्त फायदेशीर ठरतात. सण-उत्सवात आपण त्वचेची जास्त काळजी घेतो. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी, आपल्या त्वचेचा प्रकार समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे. होळीच्या रंगांमुळे त्वचा आणि केसांना अनेक प्रकारची हानी होते. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या आपण चुकूनही करू नये. आम्ही तुम्हाला त्वचेच्या काळजीसाठी काही सोप्या टिप्स देखील सांगणार आहोत.
होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण कसे करावे?
केसांची काळजी न घेता आपण होळी खेळायला लागतो, त्यामुळे केसांना रंग येतो. होळीच्या रंगांमुळे केस कोरडे होतात आणि होळी खेळल्यानंतर केसांमधून बरेच दिवस रंग बाहेर पडत राहतो. तुमचे केस खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही केसांना खोबरेल तेल लावू शकता. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या केसांना स्कॅल्पपासून लांबीपर्यंत कोरफडीचे जेल लावू शकता. या दोन्ही गोष्टी होळीच्या रंगांपासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करतील.
होळीच्या रंगांनी त्वचेची काळजी कशी घ्याल?
त्वचा अतिशय नाजूक असते आणि होळीच्या रंगांमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. यासाठी तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका. या सर्व गोष्टी तुमच्या त्वचेला होळीच्या रंगांपासून वाचवण्यास मदत करतील आणि सर्व प्रकारच्या त्वचेच्या संसर्गापासून त्वचेची काळजी घेण्यास मदत करतील.
होळीच्या रंगांनी नखांची काळजी कशी घ्याल?
होळीचे रंग अनेकदा नखांच्या आत जमा होतात. या रंगांपासून तुमच्या नखांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नखांवर आधी बदामाचे तेल लावू शकता. हे तुमच्या नखांना घाणेरडे होण्यापासून तर वाचवेलच पण तुमच्या हातांना योग्य प्रकारे मॉइश्चरायझ करण्यातही मदत करेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Holi 2024 : होळीच्या दिवशी 'लूकींग लाईक ए वॉव' दिसायचंय? 'या' रंगांची साडी घाला, जणू अभिनेत्री शोभाल, फोटो येतील सुंदर!