एक्स्प्लोर

World Cancer Day 2023 : स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये जेनेरिक औषधं ठरत आहेत प्रभावी

World Cancer Day : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते.

World Cancer Day : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग (Cancer) म्हणजे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer). भारतात, दरवर्षी 1.3 दशलक्षाहून अधिक कॅन्सरची नवीन प्रकरणे आढळून येतात आणि दरवर्षी 8.5 लाखांहून अधिक कर्करुणांचा मृत्यू होतो. कर्करोग ही केवळ आरोग्याची समस्या नसून ती सामाजिक, आर्थिक, विकासात्मक घटकांवरही तितकाच परिणाम करते. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. दरम्यान स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये जेनेरिक औषधं प्रभावी ठरत असून रुग्णांना परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचं चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाचे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयंत गावंडे म्हणाले.

जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि स्त्रियांमध्ये सर्वाधिक निदान झालेला कर्करोग आणि मृत्यूचे कारण ठरत आहे. ग्लोबोकॅन 2020 नुसार भारतात दरवर्षी जवळपास 1.7 लाख नवीन प्रकरणे आढळून आली आहेत त्यापैकी 90 हजार रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी ओरल थेरपीज उपलब्ध

डॉ.जयंत गावंडे (मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, चिंचवड) सांगतात की, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना तो बरा होण्यासाठी आणि कर्करोगातून मुक्त होण्याकरता नवनवीन संशोधने सुरु आहेत. रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने नवीन तोंडावाटे घेण्यात देण्यात येणारी औषधे देखील आता उपलब्ध होत आहेत. पूर्वी रुग्णांवर शस्त्रक्रियेशिवाय केवळ केमोथेरपी, रेडिएशन थेरेपी आणि हार्मोन्सवर उपचार केले जात होते. आता ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्तनाच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनातील प्रगतीमुळे महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. हार्मोन पॉझिटिव्ह मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करण्यासाठी CDK4/6 इनहिबिटरसारख्या नवीन ओरल थेरपीज उपलब्ध झाल्या आहेत. भारतात 60 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आहेत.

रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषध उपलब्ध करुन देण्याचा मानस : डॉ. गावंडे

भारतीय कंपन्यांनी भारतात पालबोसीक्लेब (Palbociclib) (एक CDK4/6 इनहिबिटर) ची जेनेरिक आवृत्ती सादर केली आहे. 90 हजार रुपयांचे हे जेनेरिक औषध 5000 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे, ज्यामुळे रुग्णांना पैशांअभावी उपचार थांबवावे लागणार नाहीत. भारतीय रुग्णांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जेनेरिक औषधांचा परिचय करुन रुग्णांना परवडणाऱ्या दरात ते औषध उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया डॉ. गावंडे यांनी व्यक्त केली.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ahilyanagar Leopard Rescue : 80 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला 'असं' केलं रेस्क्यू!ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 31 January 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNamdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास
Donald Trump on India and China : डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
डोनाल्ड ट्रम्प यांची आता एकाचवेळी भारत आणि चीनला थेट धमकी! म्हणाले, 'तसे करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी..'
Dhananjay Munde Bhagwangad: नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
नामदेवशास्त्रींनी एका झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडेच्या पाठिशी उभा केला, भाजपसोबत अजितदादांना इशारा?
Economic Survey 2025 : आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
आर्थिक पाहणी अहवाल कोण तयार करतं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन अहवाल कधी सादर करणार?
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
भगवानगडावर आलेल्या धनंजय मुंडेंच्या हाताला सलाईन, नामदेवशास्त्रींचा मोठा दावा; म्हणाले, किती सहन...
Namdevshastri Maharaj PC On  Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Namdevshastri Maharaj PC On Dhananjay Munde : नामदेव महाराज शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
Embed widget