एक्स्प्लोर

हिवाळ्यात पाणी कमी पिणं ठरणार धोक्याचं, मुतखडा होण्यापूर्वी दिसतात ही लक्षणे, उपाय काय? डॉक्टर सांगतात...

हिवाळ्यात होणाऱ्या निर्जलीकरणामुळे मूतखड्याची शक्यता वाढते. मूतखड्याची कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होऊ शकते.

Winter Kidney Health: तापमान कमी होत असताना, बरेच लोक नकळत कमी पाणी पितात, ज्यामुळे निर्जलीकरण होते, जे मूतखडा होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. मूतखडे हे कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिड सारख्या खनिजांपासून बनलेले घन स्फटिक असतात जे मूत्रपिंडात जमा होतात. जेव्हा हे खडे मूत्रमार्गातून जातात तेव्हा प्रचंड वेदना आणि अस्वस्थता निर्माण करू शकतात.

मूत्रपिंडातील खडे होण्यामागची कारणं म्हणजे पाणी कमी पिणे. मीठ, प्रथिनं आणि प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंडात खडे तयार होतात. कोरडी हवा आणि घामाचे प्रमाण कमी झाल्याने तहान देखील कमी लागते. ज्या लोकांना मूतखड्याचा इतिहास आहे किंवा लठ्ठपणा, मधुमेह किंवा संधिविकार यासारख्या आजारांचा वैद्यकिय इतिहास आहे त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो.हिवाळ्यात होणाऱ्या निर्जलीकरणामुळे मूतखड्याची शक्यता वाढते. मूतखड्याची कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होऊ शकते. प्रत्येकाने आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. असे मुंबईतील चेबुरच्या झेन अॅनेक्स, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या किडनीतज्ञ डॉ. भाविन पटेल यांनी हिवाळ्यात मूत्रपिंडांचे संरक्षण करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे.

काय आहेत लक्षणे?

पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ होणे, मळमळ किंवा उलट्या होणे, फेसाळ किंवा लालसर लघवी होणे तसेच वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे ही लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते किंवा संसर्ग होतो. किडनी स्टोनवर तज्ञांकडून त्वरित व्यवस्थापन करणे गरजेचे राहील.

उपचार काय?

किडनी स्टोनवर उपचार हे त्या खड्याच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असतात. लहान खडे बहुतेकदा नैसर्गिकरित्या निघून जातात. मोठ्या दगडांना मात्र शॉक वेव्ह थेरपी (लिथोट्रिप्सी), युरेटेरोस्कोपी सारख्या वैद्यकीय प्रक्रियेची आवश्यकता भासते.

प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापन कसे कराल?

तहान लागली नसली तरीही दररोज 10 ते 12 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी किंवा हर्बल टी, जसे की पुदीना, कॅमोमाइल किंवा हिबिस्कस असे पर्याय निवडा. जास्त सोडियममुळे लघवीमध्ये कॅल्शियम जमा होते. म्हणून, प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे सेवन टाळा. लिंबू आणि संत्री सारख्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घ्या, जे मूतखड्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करा. व्यायामामुळे चयापचय प्रक्रिया सुधारते आणि मूत्रपिंडांचे कार्य चांगले राहण्यास मदत होते. लघवीच्या रंगातील बदलांचे निरीक्षण करा आणि कोणतीही असामान्यता आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला वेदना, जळजळ किंवा लघवीवाटे रक्त येत असेल तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

हिवाळ्यात जेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो तेव्हा मूतखडा टाळता येतो. म्हणून द्रवपदार्थांचे सेवन करणे, पौष्टिक आहार घेणे आणि सक्रिय जीवनशैली बाळगणे हे तुमच्या मूत्रपिंड आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget