Health Tips : अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर 'या' पाच गोष्टी खाण्याची चूक करु नका, अन्यथा...
Foods Not To Eat After Sprouted Chana : अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणं टाळावं. अंकुरलेल्या हरभऱ्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन असतात, ते पचनास मदत करतात. त्यामुळे यासोबत काही पदार्थ खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते.
मुंबई : अंकुर आलेली कडधान्ये खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. अंकुरलेले चणे (Sprouted Chana) म्हणजे हरभरे आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात. अंकुर आल्याने हरभऱ्यातील पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वे यांचं प्रमाण वाढतं. अंकुरलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि अनेक समस्यांपासूनही सुटका मिळते. कोंब आलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते, यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर 'या' पाच गोष्टी खाऊ नका
काही जणांना नाश्त्याच्या वेळी अंकुरीत चणे खायला आवडतं. पण अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणं टाळणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात यामुळे पोटासंबंधित समम्या होऊ शकतात. याबाबत सविस्तर माहित जाणून घ्या.
1. दूध पिऊ नका
अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तास दूध पिऊ नये. यामुळे नैसर्गिक पौष्टिक घटकांसह संतुलितपणे आहार पचायला वेळ मिळेल. अंकुरलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आणि दुधामध्ये असलेले कॅल्शियमचे शरीरात ऑक्सलेट तयार होतात. ऑक्सलेटमुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते.
2. अंडी खाऊ नका
स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन के आणि प्रथिने असतात, तर अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असतात. अंड्यातील प्रथिनांच्या प्रमाणामुळे चणे पचन होण्यास वेळ लागू शकतो. याच्या मिश्रणाने पोटात गॅस, पेटके आणि अपचणाची समस्या उद्भवू शकते.
3. लसूण देखील खाऊ नका
लसूण खाल्ल्याने त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. त्याचे सेवन हानिकारक ठरू शकतं. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुम आणि लाल चट्टे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
4. लोणचं खाऊ नका
अंकुरलेल्या चण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असतं. तर, लोणच्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर जास्त प्रमाणात असते. हे एकत्र सेवन केल्याने पोटात जळजळ, अॅसिडीटी आणि अपचन होऊ शकते. लोणच्याची आंबट आणि खारट चव अंकुरलेल्या हरभऱ्याच्या पचनास अडथळा ठरू शकतो. त्यामुळे अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तासांनंतरच लोणचं खावं.
5. कारलं खाऊ नका
अंकुरलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन के असते आणि कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. दोन्ही जीवनसत्त्वांचे मिश्रण शरीरात ऑक्सलेट तयार करू शकते जे हानिकारक आहे. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Paper Straw : कागदी स्ट्रॉचा वापर आरोग्यासाठी घातक! हानिकारक रसायनांचा शरीरावर वाईट परिणाम; संशोधनात धक्कादायक माहिती समोर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )