एक्स्प्लोर

Health Tips | वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करताय? उद्भवतील गंभीर समस्या, रिसर्चमधून खुलासा

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तसेच अनेक जण उपाशी राहून किंवा डाएटिंग करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे, वाढलेलं वजन. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेतला जातो. तसेच डाएटिंगही केली जाते. अनेक लोकांचा असा समज असतो की, डाएटिंग केल्यामुळं वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डाएटिंग केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा तुम्ही उपवास करता किंवा कमी कार्ब असलेल्या पदार्थांचा आहारत समावेश करता, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची हेळसांड करत असता. यामुळे थेट तुमच्या शरीराव विपरित परिणाम होत असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामागे एक वैज्ञानिक कारणंही आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक डाएटिंग केल्यामुळे प्रत्यक्षात वजन कमी होण्याऐवजी वाढतं. तसेच मांसपेशिंमध्ये कमतरता होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, 32 लोक जे लठ्ठपणामुळे त्रस्त नव्हते, त्यांनी ज्यावेळी तीन आठवड्यांसाठी 1,300 च्या सरासरीने आहारात कॅलरी घेणं कमी केलं त्यावेळी त्यांचं वजन वाढलं आणि स्नायूंमध्ये कमतरता येण्यास सुरुवात झाली.

कमी आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीराची ऊर्जा निर्माण होण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे थकवा येतो. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कमी कार्ब असणाऱ्या आहाराच्या सेवनानं शरीराला थकवा येतो. त्यामुळे आपल्या आहारातून पूर्णपणे कार्ब हद्दपार करणं हानिकारक ठरतं.

केवळ थकवा किंवा कमजोरी नाही तर डायटिंगमुळे शरीराला अनेक आजार होण्याचाही धोका असतो. हावर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच काळापर्यंत उपवास करणाऱ्या लोकांमध्ये डोकेदुखी आणि बद्धकोष्ठ यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त डाएटिंगमुळे केसही गळतात. एवढंच नाहीतर इटिंग डिसऑर्डर यांसारखे आजारही उद्भवू शकतात.

(टिप : सदर गोष्टी संशोधनातून समोर आल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

संबंधित बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Waist to Hip Ratio: वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
वजन कमी असूनही धोका असू शकतो! केवळ BMI नाही, Waist-to-hip ratio तपासणंही गरजेचं, कारण...
Kitchen Cockroach Control : स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
स्वयंपाकघरातून रात्रीच झुरळे बाहेर का पडतात? 'ही' आहेत 5 मुख्य कारणे आणि सोपे उपाय
Women Health: 20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका
20 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढतोय हा गंभीर धोका; स्तनात 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget