Weight Loss Food : वजन कमी करण्यासाठी, आपल्याला आपला आहार सुधारण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही व्यायाम किंवा योगाचा तुम्हाला खूप फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवता आणि त्यातही सुधारणा कराल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा अधिक समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय तुमच्या आहारातून पांढऱ्या रंगाच्या गोष्टीं काढून टाकून तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश करा. तुम्ही पांढर्‍या तांदळाऐवजी काळा तांदूळ खा, साखरेऐवजी ब्राऊन शुगर किंवा गूळ खा. याशिवाय तुम्ही ब्लॅक बेरी आणि ब्लॅक लसूण यांचाही आहारात समावेश करू शकता. या सर्व गोष्टी वजन कमी करण्यास मदत करतील. या काळ्या गोष्टींमध्ये सर्व पोषक तत्व असतात तसेच मधुमेह, हृदय आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. या काळ्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.


1. काळा तांदूळ - वजन कमी करण्यासाठी तुम्ही भात खाऊ शकता, पण तुमच्या जेवणात ब्राऊन राईस किंवा ब्लॅक राईसचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ते आरोग्यासाठी अनेक फायदेशीर आहे. काळ्या तांदळात भरपूर प्रमाणात एन्थोसायनिन्स असते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. हे एक अँटिऑक्सिडेंट आहे यामुळे जळजळ कमी होते. काळ्या तांदळात भरपूर फायबर आणि पोषक तत्व असतात. टाईप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो. हा भात खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते.


2. काळा लसूण - जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर काळ्या लसूणचा आहारात समावेश करावा. काळ्या लसणाची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये पांढऱ्या लसणापेक्षा दुप्पट अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळा लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.


3. काळे अंजीर - काळ्या अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. काळ्या अंजीरमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अंजीर खाल्ल्याने शरीराला कर्करोगाशी लढण्याची क्षमता मिळते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha