Health Care Tips : हिवाळ्यात मॉर्निंग वॉकला जाण्याचा कंटाळा येत असतो. पण उत्तम आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक आवश्यक आहे. हिवाळ्यात हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकजण कोणती ना कोणती फिजिकल अॅक्टिव्हिट करतात. काही लोक आपल्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमध्ये मॉर्निंक वॉकचा समावेश करतात. जे लोक मॉर्निंग वॉक करण्याला पसंती देतात ते थंडीच्या दिवसातही ही सवय कायम ठेवतात.


काही लोक रोज सकाळी रस्त्यावर, किंवा पार्कमध्ये किंवा मोकळ्या जागी सकाळी सकाळी वॉकसाठी जातात, पण थंडीच्या दिवसात असे करणे कित्येकदा त्रासदायक ठरू शकते. हिवाळ्यातील थंड हवा आरोग्यासाठी धोकादायक असते. अशावेळेस मॉर्निंग वॉकला बाहेर जाण्याऐवजी घरीच व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.  


आळस दूर करा
आळशीपणामुळे अनेक कामांना उशीर होतो. त्यामुळे तुमचेच नुकसान होते. त्यासाठी सकाळी लवकर उठायला हवे आणि व्यायाम केला पाहिजे. 


दीर्घ श्वास
पोटभर आहार करून चालायला जाऊ नका. मॉर्निंग वॉकला जाताना उबदार कपडे घाला. 
सर्दी होणार नाही याची काळजी घ्या. 


रात्रीचे चालणे
झोपण्याच्या दोन तास आधी रात्रीचे जेवण केले पाहिजे. जेवनानंतर लगेचच पाणी पिऊ नये. थोड्या वेळाने बाहेर चालायला जावे. रात्रीच्या वेळी मांसाहारी आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. रात्री हलका आहार करावा. 


थंड पाणी पिणे टाळा
सकाळी वॉकला जाऊन आल्यावर गार पाणी अजिबात पिऊ नका. तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर कोमट पाणी प्या. थंड पदार्थ खाणेदेखील टाळा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर


Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!


Budget 2022 : तणाव आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी ‘National Mental Health Program’, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha