Coffee Benefits : काही लोकांना चहा प्यायला आवडतो तर काहींना कॉफी. हिवाळ्यामध्ये गरम गरम कॉफी प्यायल्यानं शरीरात उर्जा निर्माण होते. दररोज किती कॉफी प्यावी? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जाणून घ्या दररोज किती कॉफी पिणे योग्य तसेच कॉफीचे फायदे...
कॉफीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. कॉफी मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी तसेच हार्टची समस्या असणाऱ्या लोकांसाठी फायदेशिर ठरते. रिपोर्टनुसार, दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यावी. तसेच थकवा देखील कॉफी प्यायल्याने दूर होतो. कॉफी प्यायल्याने 10 टक्के मेटाबॉलिक रेट वाढतो
कॉफीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो
एका रिसर्चमधून असे लक्षात आले आहे की, दररोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो. कॉफी पिणाऱ्या लोकांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. रिसर्चमध्ये असे मांडण्यात आले आहे की, योग्य प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
वजन कमी होते
कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे मॅटाबॉलिज्म चांगले होते. तसेच कॉफीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे वजन कमी होते.
कॉफी प्यायल्याने होणारे नुकसान-
कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात कॉफी प्यावी. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं होतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Coffee Or Chocolate: कॉफी की चॉकलेट? काय आहे आरोग्यासाठी फायदेशिर
Omicron Variant Alert : हिवाळ्यात खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरातील 'या' वस्तूंचे करा सेवन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha