Mix Veg Garlic Soup : थंडीत गरम सूप प्यायला मिळाले, तर फार छान वाटते. भाज्यांचे सूप पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असते. त्यात, थोडीशी लसूण घातली, तर ते अधिक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनते. लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकता.
मिक्स व्हेजिटेबल सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही भाजी घालू शकता. सूप घट्ट आणि चविष्ट होण्यासाठी, तुम्ही ही पौष्टिक कृती नक्की ट्राय करू शकता. आवडत असल्यास या सूपमध्ये बारीक ओट्सही मिसळू शकतात. यामुळे सूपची चव वाढवेल. हिवाळ्यात, हे सूप तुम्हाला संसर्गाशी लढण्यास मदत करेल आणि प्रतिकारशक्ती देखील वाढवेल. मिक्स व्हेजिटेबल गार्लिक सूप तुम्ही घरी पटकन तयार करू शकता. जाणून घ्या याची रेसिपी जाणून घ्या.
रेसिपी :
* सर्वप्रथम एका खोलगट नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. आता 2 चमचे लसूण आणि 1 कप कांदा घालून मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटे परतून घ्या.
* आता त्यात बारक चिरलेल्या भाज्या, कोबी, गाजर, ब्रोकोली, बीन्स, कॉर्न आणि इतर भाज्या मिक्स करा.
* आता त्यात 3 कप पाणी, मीठ आणि काळी मिरी घालून चांगले मिक्स करा.
* आता त्याला 2 मिनिटे ढवळत असताना मध्यम आचेवर शिजवा.
* त्यात ओट्स आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. 1 मिनिट शिजवा, तुमचे गरमागरम टेस्टी-हेल्दी व्हेजिटेबल सूप तयार आहे.
मिक्स व्हेजिटेबल सूपचे फायदे
मिश्र भाज्यांचे सूप प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यात ओट्स घातल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या प्रकारचे सूप प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. भाज्यांचे सूप प्यायल्यानेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. मिक्स व्हेजिटेबल गार्लिक सूप प्यायल्याने हृदयालाही खूप फायदा होतो.
संबंधित बातम्या :
- Covid-19: कोरोनापासून बचाव करण्यासठी जीवनशैलीत 'असा' बदल करा, संसर्ग होणार नाही
- Covid19 : इम्युनिटी वाढवतात 'या' गोष्टी, ओमायक्रॉनपासूनही होईल संरक्षण
- Omicron Variant Alert : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha