Lemon Peel Powder Uses : लिंबाची साले फेकून देण्याऐवजी तुम्ही तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये त्याचा समावेश करू शकता. त्वचा आणि केसांच्या संबंधित अनेक समस्यांवर हा उत्तम घरगुती उपाय आहे. तुम्ही लिंबाची साले सुकवून त्याची पावडर बनवून वापरु शकता. हे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप प्रभावीपणे काम करते.


Beauty Tips at Home : होममेड लिप स्क्रब बनवा
हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या खूप सामान्य आहे. यासाठी लोक विविध प्रकारचे केमिकल युक्त स्क्रब वापरतात, त्याऐवजी तुम्ही नैसर्गिक गोष्टींसह घरी सहज बनवू शकता. यासाठी प्रथम अर्धा चमचा लिंबाच्या सालीची पावडर घेऊन त्यात पिठीसाखर मिसळा. त्यात बदामाचे तेल मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट ओठांवर लावा आणि हळूवारपणे स्क्रब करा. डेड स्किन काढण्यासोबतच ते ओठांना मुलायम ठेवतात. यनंतर ओठ स्वच्छ करा. ही पद्धत दर दोन दिवसांनी वापरून पाहा.


Beauty Tips at Home : कोंड्याची समस्या दूर होईल
डोक्यातील कोंडा हा देखील मृत त्वचेचा एक प्रकार आहे, जो टाळूवर पुन्हा पुन्हा खपल्यासारखा दिसतो. नियमितपणे स्कॅल्प एक्सफोलिएट करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासाठी लिंबाच्या सालीची पावडर आणि खोबरेल तेल दोन्ही चांगले मिसळा. आता या मिश्रणाने तुमची टाळू पूर्णपणे मालिश करा आणि 1 तास राहू द्या. 1 तासानंतर आपले केस पाण्याने स्वच्छ धुवा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा.


Beauty Tips at Home : त्वचेचा रंग उजळण्याचे काम करते
लिंबू हा एक प्रकारचा नैसर्गिक त्वचा उजळणारा आहे, कारण त्यात सायट्रिक ऍसिड असते, जे ब्लीचिंग एजंट मानले जाते. अशा स्थितीत कोपर, गुडघे किंवा पायाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. अर्धा चमचा बेसनामध्ये 1 चमचा लिंबाच्या सालीची पावडर मिसळून घासून घ्या. जर तुम्हाला आंघोळ करण्यापूर्वी हवे असेल तर तुम्ही फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावरही लावू शकता.


Beauty Tips at Home : लिंबाच्या सालीने नखे स्वच्छ करा
अनेक वेळा घाण किंवा केमिकल असणाऱ्या गोष्टींच्या वापरामुळे नखांचा नैसर्गिक रंग उडू लागतो. अशा वेळी, आपण लिंबाची साल वापरू शकता. आंघोळीच्या काही मिनिटे आधी, लिंबाच्या सालीने नखांवर चांगल्या चोळा आणि नंतर 15 मिनिटे राहू द्या. 15 मिनिटांनंतर, आंघोळ करताना पुन्हा नखं स्वच्छ करा. नियमित वापराने, तुम्हाला तुमच्या नखांमध्ये फरक दिसेल.


Beauty Tips at Home : फेस पॅक बनवण्याची सोपी पद्धत
जर तुमची त्वचा तेलकट असेल आणि वारंवार मुरुमांची समस्या जाणवत असेल तर लिंबाच्या सालीची पावडर वापरा. अर्धा चमचा लिंबाच्या सालीची पावडर घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. त्वचा कोरडी वाटत असेल तर लगेच कोरफडीचे जेल अथवा मॉईश्चराईझर लावा.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha