Smoking : सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिताय? तर सावधान! 'एवढा' दंड भरावा लागेल
Smoking Fine : गर्दी असलेल्या कोणत्याही ठिकाणी सिगारेट ओढण्यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणी सिगारेट ओढताना पकडल्यास त्याला दंड भरावा लागेल.
Smoking Rules : चहा-सुट्टा... अनेकांना चहासोबत (Tea) सुट्टा (Cigarette) पिण्याची सवय असते. एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात सिगारेट असे बरेच जण तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण असे केल्याने तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. गर्दी असलेल्या कोणत्याही ठिकाणी सिगारेट ओढण्यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणी सिगारेट ओढताना पकडल्यास त्याला दंड भरावा लागेल. तुम्ही सिगारेट पेटवून रस्त्यावर किंवा गर्दीच्या ठिकाणी धुम्रपान सुरु केल्यास तुम्हाला महागात पडू शकते. धुम्रपान करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हे नियम मोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल किंवा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. सिगारेट पिणे म्हणजे धूम्रपानासंदर्भातील नियम जाणून घ्या.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई
भारतीय दंड विधान (IPC) कलम 278 नुसार, कोणत्याही गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे हा गुन्हा आहे, यासाठी दंडाची तरतूद आहे. गजबजलेल्या रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट प्यायल्यास तुमच्यावर चालान लागू शकते आणि जर तुम्ही दंड न भरल्यास तुम्हाला तुरुंगातही जावं लागू शकतं.
सिगारेट फुंकणाऱ्यांनो सावधान! 'एवढा' दंड भरावा लागेल
कोणतीही व्यक्ती गर्दीच्या किंवा सार्वजिक ठिकाणी सिगारेट पिताना आढळल्यास 200 रुपये दंड आकारला जातो, जो जागेवरच भरावा लागतो. अनेक ठिकाणी 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. जर तुम्ही मोकळ्या जागेत धुम्रपान करत असाल आणि तुमच्या धुम्रपानामुळे कोणाला कोणतीही त्रास होत नसेल, तर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
यामुळे, अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्मोकिंग झोन तयार केले जातात. तुम्ही विमानतळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये स्मोकिंग झोन तुम्ही पाहिले असतील. काही ऑफिसेसमध्येही वेगळे स्मोकिंग झोन असतात. धुम्रपान कक्ष म्हणजेच स्मोकिंग झोनसाठीही काही नियम करण्यात आले आहेत.
स्मोकिंग झोनचे नियम
- स्मोकिंग झोनमध्ये वेंटिलेशन असणे आवश्यक आहे.
- स्मोकिंग झोन अशा ठिकाणी असले पाहिजे जिथून धूर निघाल्यावर कोणालाही त्रास होणार नाही.
'या' ठिकाणी तुम्ही सिगारेट ओढण्यास सक्त मनाई
दरम्यान, काही ठिकाणे अशी आहेत, जिथे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत धुम्रपान करु शकत नाही. कोणत्या ठिकाणी सिगारेट ओढण्यास मनाई आहे, ते पुढे वाचा. हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, पार्क, रेस्टॉरंट, हॉटेल, सार्वजनिक कार्यालय, न्यायालयीन इमारत, शाळा, कॉलेज, ग्रंथालय, सार्वजनिक वाहतूक, स्टेडियम, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, बस स्टॉप, विमानतळ, रेल्वे स्टेशन अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही सिगारेट ओढू शकत नाही.
धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक
सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे कॅन्सर होऊन जीवही जाऊ शकतो. तशा प्रकारच्या सूचनाही सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेल्या असतात. पण त्या वाचूनही अनेकजण सिगारेट ओढतात. कॅन्सरची सूचना देऊनही सिगारेट ओढणारे लोक ती सोडत नाहीत. आजकालच्या तरुणाईमध्ये सिगारेट ओढणं हे कॉमन होत आहे, यामध्ये तरूणींचीही संख्या मोठी आहे. तरुणाईमध्ये चेन स्मोकिंगचं व्यसनंही वाढताना दिसत आहे. सिगारेट ओढण्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम तर होतोच, पण जीवही जाऊ शकतो. सिगारेट ओढण्याची ही इच्छाच या सर्वाच्या मुळाशी आहे. त्यामुळे सिगारेट ओढण्याच्या या इच्छेवर नियंत्रण ठेवून वेळीच धूम्रपान सोडा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Winter Health Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणं पडेल महागात, 'हे' 3 तोटे माहितीयत?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )