एक्स्प्लोर

Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, घरीच तयार करा 'हे' पाच फेस पॅक!

Skin Care Tips : चेहऱ्याची त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्यामुळे उन्हाळ्यात फेस पॅक लावून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची खास काळजी घेऊ शकता. या लेखात पाच फेस पॅकबाबत माहिती देणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी योग्य असतील

Skin Care Tips : उन्हाळ्यात (Summer) त्वचा हायड्रेट ठेवणं आणि त्वचेच्या खोलपर्यंत स्वच्छ करणं खूप महत्वाचे आहे. असं केली नाही तर आपली त्वचा लवकर खराब होऊ शकते. विशेषत: चेहऱ्याची त्वचा (Skin). कारण चेहऱ्याची त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्यामुळे उन्हाळ्यात फेस पॅक (Face Pack) लावून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची खास काळजी घेऊ शकता. या लेखात पाच फेस पॅकबाबत माहिती देणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी योग्य असतील. जाणून घेऊया हे पाच फेस पॅक कोणते आणि ते कसे बनवायचे?

फ्रेंच ग्रीन क्ले फेस पॅक

फ्रेंच ग्रीन फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात पाव चमचा मध घेऊन त्यात थोडं पाणी घालून पातळ करा. यानंतर त्यात एक अंड्याचा पांढरा भाग घाला, नंतर त्यात एक चमचा फ्रेंच ग्रीन क्ले मिसळा. इसेन्शियल ऑईलचे काही थेंब घालून मिश्रण एकजीव करुन त्यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. फेस पॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून कोरडा करा.

बेंटोनाईट क्ले पॅक

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बेंटोनाईट क्ले फेस मास्क फारच फायदेशीर आहे. हा फेस पॅक तयार करण्यासाठी, 3 ते 4 चमचे बेंटोनाईट क्ले घ्या. त्यात 5 ते 7 थेंब इसेन्शियल ऑईल टाका. मग त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि मिश्रण एकजीव करुन पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्याला लावा.

अॅवाकाडो क्ले फेस मास्क

अॅवाकाडोमुळे आपल्या त्वचेमधील कोलेजन वाढतं आणि त्वचेची जळजळ आणि सूज कमी होते. यात व्हिटॅमिन ई देखील आढळते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. एवोकॅडो क्ले मास्क बनवण्यासाठी प्रथम एवोकॅडो मॅश करा, नंतर त्यात फेटलेलं दही आणि मध घालून पेस्ट बनवा. तयार झालेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा.

मुल्तानी क्ले मास्क

मुल्तानी मातीचे फायदे आपल्या सर्वांना माहित आहेत. मुल्तानी माती आपल्या चेहऱ्यावरील घाण काढून टाकते आणि तेलावर नियंत्रण ठेवते. मुल्तानी क्ले मास्क बनवण्याची कृती जाणून घेऊया. यासाठी एक चमचा मुल्तानी मातीमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाका, अर्ध्या लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा. हा पेस पॅक चेहऱ्याला लावा आणि वाळल्यानंतर चेहरा धुवून टाका 

चारकोल क्ले मास्क

चारकोल क्ले मास्क हा त्वचेतील घाण आणि तेल काढतो आणि छिद्रे बंद करतो. चारकोल क्ले फेस मास्क बनवण्यासाठी कोळशाच्या कॅप्सूल घ्या. एका वाटीत चारकोलच्या कॅप्सूल रिकाम्या करा. नंतर त्यात चिमूटभर हळद आणि कोरफड जेल टाका, टी ट्री ऑईलचे काही थेंब टाका आणि मिश्रण एकजीव करा. तयार पेस्ट चेहऱ्याला लावा आणि काही वेळाने वाळल्यानंतर धुवून टाका.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Political Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special ReportRajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget