Nipah Virus : फळं न धुता खाताय? थांबा, इकडे लक्ष द्या, होऊ शकतो निपाहचा संसर्ग
Nipah Virus : वटवाघुळांच्या मार्फत मनुष्याच्या शरीरात आल्यानंतर निपाहचा व्हायरस हा अधिक जीवघेणा होतो. फ्रुट बॅट हे फळांवर आपले लाल फर सोडतात.
नवी दिल्ली : केरळमध्ये 3 सप्टेंबरला एका 12 वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केरळमध्ये आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सकडून (AIIMS) नागरिकांनी कोणतेही फळ धुतल्याशिवाय खाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
निपाह व्हायरसची लागण फ्रुट बॅट म्हणजे वटवाघुळांच्या मार्फत होते. एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. आशुतोष विश्वास यांनी सांगितलं की, "वटवाघुळांच्या मार्फत मनुष्याच्या शरीरात आल्यानंतर निपाहचा व्हायरस हा अधिक जीवघेणा होतो. फ्रुट बॅट हे फळांवर आपले लाल फर सोडतात. हे फळ जर मनुष्याने खाल्ल तर त्याला निपाह व्हायरस होऊ शकतो. या आजारावर विशेष असा उपचार नाही. त्यामुळे नागरिकांनी झाडावरून पडलेली फळं किंवा बाजारातून आणलेली फळं ही स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नयेत."
पाळीव प्राण्यांपासूनही धोका
एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्राध्यापक डॉ. आशुतोष विश्वास यांनी सांगितलं की, "वटवाघुळांप्रमाणेच बकरे, मांजर, घोडा, कुत्रे, डुक्कर अशा पाळीव प्राणांपासूनही निपाह व्हायरसचे संक्रमण होऊ शकते. त्यामळे याची तीव्रता वाढते आणि मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण होतो."
निपाह जीवघेणा विषाणू
प्राण्यांमधून माणसामध्ये त्याचा प्रसार झाल्यानंतर तो अत्यंत जीवघेणा आजार असतो. त्यामुळे या आजाराबाबतही चिंता व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात दोन वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये 'निपाह' हा विषाणू आढळून आला होता. मार्च 2020 साली महाबळेश्वरच्या एका गुहेत ही वटवाघुळं आढळून आली होती. त्यांच्यामध्ये निपाह नावाचा विषाणू असल्याची माहिती मिळत आहे. 2018 साली केरळमध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झालेलं होतं.
निपाह व्हायरसची लक्षणं
ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत. जगभरात निपाह हा हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही हा व्हायरस अत्यंत धोकादायक असल्याचं सांगण्यात आलंय.
संबंधित बातम्या :
- Nipah virus : केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह व्हायरसचं संकट गडद, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
- Nipah Virus : केरळात जीवघेण्या निपाह व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव, काय आहेत लक्षणं?
- Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जारी, आजचे दर काय?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )