National Bone and Joint Day 2024: सांधेदुखीने कळवळताय? मग दुखऱ्या भागावर हलक्या हाताने आजच करा 'हा' घरगुती उपाय!
4 ऑगस्ट हा राष्ट्रीय हाडे आणि सांधेदुखीचा दिवस हा याबाबतच जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सांध्यांमधला त्रास, याची लक्षणे आणि उपायांचा दर्जा वाढवण्यासाठी घोषित करण्यात आलाय.
National Bone and Joint Day 2024: बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल तरुणपणीच सांधेदुखी मागे लागल्याची अनेक उदाहरणे दिसतात. बसल्या जागी कामामुळे वजन वाढतं आणि सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. स्नायूंमध्ये लवचिकता राहत नाही परिणामी असह्य वेदनांपासून सुटता यावं यासाठी अनेक जण निरनिराळे प्रयत्न करून पाहतात. वेळीच लक्ष दिलं नाही तर शस्त्रक्रियेपर्यंत ही सांधेदुखी पोहोचू शकते.
4 ऑगस्ट हा राष्ट्रीय हाडे आणि सांधेदुखीचा दिवस हा याबाबतच जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सांध्यांमधला त्रास, याची लक्षणे आणि उपायांचा दर्जा वाढवण्यासाठी घोषित करण्यात आलाय.
सूज रोखण्यासाठी वापरा हळदीचे तेल
एखादा घरगुती उपाय केला की सांधेदुखी लगेच निघून जाईल हे अजून तरी शक्य नाही. मात्र असे काही उपाय आहेत जे तुमचा वेदना कमी करून तुम्हाला आराम देऊ शकतात. हळदीचे तेल हा सांधेदुखीवर आराम देणारा घरगुती उपाय समजला जातो. हळदीच्या तेलात अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरावर येणारी सूज रोखण्यासाठी तसेच त्वचेवरील कोणत्याही प्रकारचे फंगस या तेलाचा वापरामुळे वाढत नाहीत असे म्हणतात.
त्वचेवरील विषाणू जंतू होतात नष्ट
आयुर्वेदामध्ये ही हळदीला मोठे महत्त्व असून वेगवेगळ्या औषधांमध्ये ही हळदीचा वापर केला जातो. सर्दी पडशासह कितीतरी आजारांमधील घरगुती उपचारांमध्ये हळद सर्रास वापरली जाते. सांधेदुखी साठी हळदीच्या तेलाचा वापर हा रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. त्वचेवरील विषाणू जंतू यांना नष्ट करण्याची क्षमता या हळदीच्या तेलामध्ये असते.
हळदीचे तेल हलक्या हाताने दुखऱ्या भागावर चोळावे
आपण आता हळदीच्या तेलाचा मुख्य उपयोग पाहुया जो सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्या लोकांना होतो. ज्या प्रकारे जखम झाल्यास ती ठीक करण्यास वा धरून ठेवण्यास हळद मदत करते त्याप्रमाणे सांधेदुखी आणि त्यामुळेहोणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी वा त्या रोखण्यासाठी हळदीचे तेल मदत करते. व्यायाम करताना अनेकांना होणारी जखम कमी करण्यास किंवा त्यामुळे होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी हळदीचे तेल मदत करतं. सांधेदुखीनी त्रस्त असलेल्यांना हलक्या हाताने हळदीचे तेल दुखऱ्या भागावर चोळण्यास सांगितले जाते. त्यामुळे सांधेदुखीच्या वेदनांवर काही दिवसात आराम दिसून येतो.
जेवणात हळदीच्या तेलाचा वापर फायद्याचा
जेवणातही हळदीच्या तेलाचा वापर केल्याने पचनासह रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. नियमितपणे हळदीच्या तेलाचा वापर केल्यास शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होते. रक्तप्रवाह वाढल्याने ऑक्सिजनचा स्तर नियंत्रणात राहून श्वसनासंबंधीत आजार टाळता येतात.
हळदीच्या तेलाचा साईड इफेक्ट नाही
हळदीच्या तेलाचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नसल्याने सांधेदुखीसाठी अन्य उपचारांसह याचाही वापर तुम्ही करून पाहू शकता. सांधेदुखी बाबत तुमच्या डॉक्टरांचा एकदा सल्ला आवर्जून घ्यावा. तसेच किती प्रमाणात व कोणत्या हळदीच्या तेलाचा वापर करावा याचाही तुम्ही निर्णय घेऊ शकता.
हेही वाचा:
Health : पावसाळ्यात मजबूत प्रतिकारशक्ती हवी, तर 'या' 4 गोष्टी जेवणाच्या ताटात असणे आवश्यक
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )