Health Tips : किती चालावं, कधी खावं, किती खावं? निरोगी आयुष्यासाठी 4 लाईफ लाईन
Tips For Healthy Lifestyle : डॉ. शिव कुमार सरीन यांनी दिर्घायुषी होण्यासाठीच्या चार लाईफ लाईन सांगितल्या आहेत. या कोणत्या ते जाणून घ्या.
![Health Tips : किती चालावं, कधी खावं, किती खावं? निरोगी आयुष्यासाठी 4 लाईफ लाईन How much to walk when to eat how much to eat four life lines for healthy life Dr Shiv Kumar Sarin s Own your body book health tips marathi news Health Tips : किती चालावं, कधी खावं, किती खावं? निरोगी आयुष्यासाठी 4 लाईफ लाईन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/25/6b7e856a896ce1b4cf8ddacebd728c5a1711352276249322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Four Life Lines For Healthy Lifestyle : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वत:च्या तब्येतीकडे बघण्यासही पुरेसा मिळत नाही. आपण व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्याला वाढत्या वयात दिसून येतो. काहींना तर कमी वयातच मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood Pressure) यासारख्या आजारांना सामोरंल जावं लागतं. तुम्हाला हे टाळायचं असेल, तर आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करताना तुम्ही तुमचं आयुष्य कमी करत आहात, त्यामुळे हे करणं तुम्हाला फार महागात पडेल.
आरोग्याकडे दुर्लक्ष करणं टाळा
डॉ. शिव कुमार सरीन यांनी दिर्घायुषी होण्यासाठीच्या चार लाईफ लाईन सांगितल्या आहेत. डॉ. सरीन यांनी म्हटलं आहे की, औषधे हा आजारावरील शेवटचा उपाय आहे. आपलं शरीर आणि इच्छाशक्तीमध्ये एवढी ताकद असते की, औषधांविना तुम्ही बरे होऊ शकता. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी यासारख्या आजारांवर उपचार म्हणून औषधं घेणं टाळा, तुमच्या इच्छा शक्तीच्या जोरावर तुम्ही एक ते दोन दिवसात या आजारांवर उपचार करु शकता, असंही डॉ. सरीन यांनी सांगितलं आहे.
जीवन की चार लाइफ लाइन..
— त्रिशूल अचूक 🔱🚩🇮🇳 (@TriShool_Achuk) March 24, 2024
तुमको सौ बार समझाया समय पर रात का भोजन करने....
समझ नहीं आता 😡 pic.twitter.com/k75D4Noky5
ही औषधे घेणं टाळा
अँटी-बायोटिक्स आणि पेनकिलर औषधं घेणं टाळा. यामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. अँटी-बायोटिक्स आणि पेनकिलर औषधांमुळे मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा त्रास झाल्यास लगेचच ही औषधे घेणं टाळा. कधी बाहेर खाल्लं तर अँटी-बायोटिक घेतली, डोकं दुखलं तर लगेच पेनकिलर घेतली, हे करणं टाळा. अँटी-बायोटिक्स आणि पेनकिलर, ट्युबरक्युलॉसिस (Tuberculosis) टीबी (TB) वरील औषधे यामुळे मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
आपल्या शरीराचे मालक व्हा
डॉ. शिव कुमार सरीन (Dr. Shiv Kumar Sarin) यांनी त्यांच्या ओन यूवर बॉडी (Own Your Body) या पुस्तकात आयुष्यासाठीच्या 4 लाईफ लाईन सांगितल्या आहेत. Own Your Body म्हणजे आपल्या शरीराचे मालक व्हा. या पुस्तकात डॉ. सरीन यांनी आयुष्यासाठी 4 लाईफ लाईन सांगितल्या आहेत.
किसी दिन दिमाग फिर गया तो फिर ना कहना......
— त्रिशूल अचूक 🔱🚩🇮🇳 (@TriShool_Achuk) March 24, 2024
अभी तो 7 बजे का समय दिया है...
आगे चलकर उसे सूर्यास्त के पहले करने कहूँगा....Mind it सुधर जाओ! pic.twitter.com/Je9pDl9zsO
आयुष्यासाठी चार लाईफ लाईन
योग्य आहार आणि वजन नियंत्रणात ठेवणे, ही पहिली लाईफ लाईन आहे. सूर्यास्तानंतर जेवू नये. रोज व्यायाम करणे ही दुसरी लाईफ लाईन आहे. वयाच्या 80 वर्षानंतर चालणे, त्याआधी जॉगिंग करणं आवश्यक आहे. दररोज किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घेणे, ही तिसरी लाईफ लाईन आहे. या तिघांचा समतोल राखला तर चौथ्या लाईफलाईनची गरज भासत नाही. चौथी लाईफ लाईन म्हणजे औषधे.
1.डाएट, वेट, सूर्यास्तानंतर जेवू नये
2.व्यायाम
3.पुरेशी झोप
4.औषधे
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Hair Health : ये रेशमी जुल्फे...बदलत्या हवामानामुळे केस Dry झाले? लांब कशाला.. स्वयंपाकघरातचं आहे रामबाण उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)