Heart Attack : आता हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदय होईल दुरुस्त, शास्त्रज्ञांनी शोधली नवीन पद्धत
Heart Bio Gel : हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदय कमकुवत होतं आणि हृदयाचे स्नायू आणि वॉल्व्ह खराब होतात. शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या बायो जेलमुळे हृदय दुरुस्त होईल.
Heart will be Repaired after Heart Attack : सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हार्ट अटॅकचे बळी ठरत आहेत. तुम्ही 20 वर्षांचे असाल किंवा 60 वर्षांचे, हृदयविकाराचा झटका प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी गंभीर धोका बनला आहे.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदय होईल दुरुस्त
अलीकडेच, इका केअरने (Eka Care) सध्याच्या आरोग्यासंदर्भात (Health) एक अहवाल प्रसिद्ध केला होता. हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या पूर्वीच्या तुलनेत सातत्याने वाढत आहे, असा दावा या अहवालामध्ये करण्यात आला होता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुणांचाही समावेश आहे.
शास्त्रज्ञांनी तयार केलं बायो जेल
हृदयविकाराच्या झटक्यानंतर हृदय कमकुवत होतं आणि हृदयाचे स्नायू आणि वॉल्व्ह खराब होतात. पण आता शास्त्रज्ञांनी कमकुवत हृदय दुरुस्त करण्यासाठी संशोधन करून जेल तयार केलं आहे. शास्त्रज्ञांनी तयार बायो जेलमुळे (Bio Gel) हृदय दुरुस्त होईल. या जेलच्या मदतीने हृदयविकाराच्या झटक्यानंतर तुमचे हृदय दुरुस्त केलं जाऊ शकतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
बायो-जेल म्हणजे काय? (What is Bio Gel?)
बायो जेल हा एक प्रकारचा अत्यंत घट्ट द्रवपदार्थ आहे. हे बायो जेल वापरण्यापूर्वी त्यात निर्जंतुकीकरण पाणी घालून पातळ केलं जातं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाचं हृदय कमकुवत होतं. हार्ट अटॅकमुळे हृदयाचे स्नायू आणि व्हॉल्व्ह खराब होतात. अशावेळी हे जेल हृदय दुरुस्त करण्यास मदत करते. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, त्याची यशस्वी चाचणी झाली असून आता हे बायो जेल सामान्य लोकांना सहज कसं उपलब्ध होईल यावर काम सुरू आहे.
बायो जेल कसं काम करतं?
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णावर बायो जेलचा वापर केला जातो. हे बायो जेल इंजेक्शनच्या मदतीने रुग्णाच्या शरीरात पोहोचवलं जातं. शरीरात गेल्यानंतर, बायो जेल हृदयाच्या खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करते. जेव्हा तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात, तेव्हा तुमच्या हृदयात काही क्रॅक होतात आणि रक्तवाहिन्यांचही नुकसान होतं. बायो जेल याची दुरुस्ती करतं, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health News : कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे काय? हृदय विकार टाळण्यासाठी काय कराल?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )