Health Tips: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती गुणकारक; लवकरच दिसेल फरक
Health Tips: काही औषधी वनस्पतींचं सेवन करून तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेऊ शकता, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता. या औषधी वनस्पतींविषयी अधिक जाणून घेऊया.
Health Tips: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त (Diabetes)आहेत. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यावर उपचार शोधणं देखील अत्यावश्यक बनलं आहे. एकट्या भारतात गेल्या चार वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 44 टक्के वाढ झाली आहे आणि सुमारे 100 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. तणाव, जास्त वजन वाढणं आणि खराब जीवनशैली ही मधुमेहाची कारणं आहेत. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामासह आयुर्वेदिक औषधी वनस्पती (Ayurvedic Herbs) रक्तातील साखरेचं योग्य नियंत्रण (Sugar Level Control) ठेवण्यास मदत करतात. काही औषधी वनस्पती आहेत, ज्या मधुमेही रुग्णासाठी फायदेशीर आहेत.
आयुर्वेद ही भारतातील एक प्राचीन औषध प्रणाली आहे. आयुर्वेदातील अनेक गुणकारी औषधांमुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णासांठी गुणकारक असलेल्या औषधी वनस्पतींची यादी पाहुयात...
कारलं
मधुमेहविरोधी गुणधर्मांसाठी कारलं बऱ्याच वर्षांपासून वापरलं जातं. कारल्यात पॉलीपेप्टाइड-पी नावाचं इन्सुलिनसारखं संयुग असतं, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतं. कारलं ग्लुकोजचं प्रमाण सुधारण्यास आणि इन्सुलिन स्राव उत्तेजित करण्यास मदत करते, ज्यामुळे ते मधुमेह व्यवस्थापनासाठी एक उत्कृष्ट पर्याय बनते.
जांभूळ
जांभूळ, ज्याला इंडियन ब्लॅकबेरी किंवा ब्लॅक प्लम असंही म्हणतात, त्यात हायपोग्लाइसेमिक प्रभाव असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यात अँथोसायनिन्स, इलाजिक ऍसिड आणि पॉलीफेनॉल सारखी बायोएक्टिव्ह संयुगं असतात, जी प्रक्रियेस मदत करतात. जांभूळ किंवा त्याचा रस सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित होते, इन्सुलिन सुधारते. जाभूळातील सत्व साखरेचं शोषण कमी करतात. जांभूळ मधुमेही रुग्णांमध्ये जखम भरण्याच्या प्रक्रियेला गती देते.
गुळवेल (टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया)
गुळवेल किंवा गिलॉय, ज्याला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया देखील म्हणतात, हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेहाची पातळी आणि मधुमेहाची इतर लक्षणं नियंत्रित करण्यासाठी या वनस्पतीची पानं बरीच प्रभावी ठरतात. ही औषधी वनस्पती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढतात. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा गुळवेलाची पावडर मिसळा आणि रात्रभर ठेवा. सकाळी लवकर प्या, यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहील, सोबत बराच फरक देखील पडेल.
गुडमार (जिम्नेमा सिल्वेस्ट्रे)
गुडमार, ज्याला जिमनेमा सिल्वेस्ट्रे म्हणूनही ओळखलं जातं, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात आणला जाऊ शकतो. हे ग्लुकोजचं शोषण कमी करून आणि इंसुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. गुडमार ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी एलर्जी, खोकला आणि बद्धकोष्ठता यासारख्या अनेक आरोग्य समस्यांच्या उपचारांमध्ये वापरली जाते. यासाठी, तुम्ही सकाळी जेवण करण्यापूर्वी एक तास आधी एक चमचा चूर्ण गुडमार पानांच्या चूर्णाचे सेवन करायला हवं.
आवळा
आवळा एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते आणि साखर वाढू देत नाही. आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जो स्वादुपिंडाचं कार्य सुधारण्यास आणि इंसुलिन स्राव वाढवण्यास मदत करतो.
आयुर्वेदिक औषधी वनस्पती मधुमेहावरील पारंपारिक वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत, परंतु ते नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेवर नियंत्रण आणि एकूणच मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
GK: 'या' फळांच्या बिया खाल्ल्यास होऊ शकतो मृत्यू; असं काय आहे त्यांच्या बियांमध्ये? पाहा...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )