एक्स्प्लोर

Health Tips : निरोगी डोळ्यांसाठी नवीन वर्षात करा 'हे' संकल्प; अनेक समस्या होतील दूर

Health Tips : डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तुम्ही या संकल्पांचा समावेश नववर्षाच्या यादीत नक्की करा.

Health Tips : नवीन वर्ष 2023 अवघ्या काही दिवसांवर आले आहे. या नवीन वर्षात तुमचेही अनेक संकल्प असतील. काहींनी शारीरिक तर काहींनी मानसिक, तसेच उज्ज्वल भविष्यासाठी अनेक संकल्प केले असतील. पण, अर्थात यामध्ये कुठेही डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हा संकल्प नसेलच. यासाठी आम्ही तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षात डोळ्यांशी संबंधित काही संकल्प सांगणार आहोत. तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही या संकल्पांचा नक्की विचार करू शकता आणि तुमच्या डोळ्यांची योग्य काळजी घेऊ शकता. हे संकल्प कोणते ते जाणून घ्या. 

वयाशी निगडित मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) आणि डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मॅक्युलामधील पेशींच्या हानीमुळे एएमडी हा विकार होतो आणि त्याचा केंद्रीय दृष्टीवर परिणाम होतो. ही समस्या वृद्ध लोकांमध्ये अधिक आढळत असली, तरी तरूणांमध्येही ही समस्या आढळून येते. यामागे आनुवंशिकतेसह अन्य अनेक घटक असतात. भारतातील एकूण मधुमेहींपैकी सुमारे 17.6 टक्के ते 28.9 टक्के मधुमेहींना डायबेटिक रेटिनोपॅथी अर्थात डीआरचा त्रास आहे. डीआर ही अनियंत्रित मधुमेहाची परिणती आहे. यामध्ये नेत्रपडद्यातील (रेटिना) रक्तवाहिन्यांना हानी होते. यात पुढे मॅक्युलामध्ये द्रवपदार्थांची गळतीही होऊ शकते. याला डायबेटिक मॅक्युलर एडीमा (डीएमई) असे म्हणतात. दर 3 मधुमेहींपैकी एकाला डीएमई होऊ शकतो. या आजारांची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात ठळकपणे जाणवत नसल्यामुळे नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते. यामुळे नेत्रविकारांचे लवकर निदान होते आणि वेळेत उपचार मिळू शकतात किंवा ते पूर्णपणे टाळणेही शक्य होते. 

मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी (Dr. Ajay Dudani) म्‍हणाले, "आमच्‍याकडे दर महिन्‍याला जवळपास 35 टक्‍के रेटिनल आजारांनी पीडित रूग्‍ण येतात. ज्‍यामुळे डोळ्यांच्‍या आजारांची लक्षणे आणि चिन्‍हे वेळेवर ओळखणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. तुम्‍हाला अंधुक दिसत असेल किंवा दृष्‍टीविषयक विकृती असेल तर त्‍वरित स्‍पेशालिस्‍टला भेट द्या. इंट्राविट्रिअल इंजेक्‍शन्‍स आणि लेझरसह डायबेटिक रेटिनोपॅथीचा वेळेवर उपचार केल्‍याने रूग्‍णांच्‍या जीवनातील उत्‍पादनक्षम काळामध्‍ये दृष्‍टी जतन करण्‍यास आणि सुधारण्‍यास मदत होऊ शकते. म्‍हणून या आजारांच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी लवकर निदान व उपचार महत्त्वाचे आहे आणि रूग्‍णांनी सतत त्‍यांच्‍या डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करण्‍यासोबत नियमित डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.’’

निरोगी दृष्टीसाठी तुम्ही हे संकल्प करू शकता 

1. धूम्रपान टाळा : धूम्रपान शरीरातील विविध इंद्रियांचे गंभीर नुकसान करू शकते. सिगारेट ओढण्यामुळे रोगप्रतिकार यंत्रणेची प्रचंड हानी होते. सिगारेटच्या धुरात आढळणारे काही विशिष्ट ऑक्सिडण्ट्स पेशींमध्ये चुरचुर (इरिटेशन) निर्माण होते आणि त्यामुळे रोगप्रतिकार यंत्रणा सक्रिय होते. याचा परिणाम म्हणून शरीरात हानिकारक दाह निर्माण होतो.

2. स्क्रीन टाइम कमी करा : मोबाईल आणि संगणकाचा अतिरिक्त वापर केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर स्क्रीनची (ब्ल्यू लाइट) पडत राहते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडण्यापासून आणि थकवा येण्यापासून ते मायोपिया आणि एएमडीसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. 

3. आरोग्यपूर्ण अन्न घ्या : शरीराचे काम योग्य रितीने सुरू ठेवणारी महत्त्वाची पोषके मिळवायची असतील तर आरोग्यपूर्ण आहार अत्यावश्यक आहे. फास्ट फूडऐवजी आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा. मासे, अंडी, दुधाचे पदार्थ, संत्री, केळी, गाजर यांमधून अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

4. डोळ्यांची नियमित तपासणी : नेत्रतज्ज्ञाला नियमित भेट दिल्यामुळे मोठ्या आजारांवर उपचार करणे तर शक्य होतेच, शिवाय डोळ्यांचा कोरडेपणा दूर होतो आणि इतर समस्याही दूर होतात.   

5. 20-20-20 नियम : आपण फारसा व्यायाम न करता दिवसभर स्क्रीनकडे डोळे लावून बसतो. थोडा व्यायाम केल्यामुळे स्क्रीनकडे बघण्यातून ब्रेक घेता येईल आणि डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहील. स्क्रीनकडे बघताना 20-20 मिनिटांचा ब्रेक घ्या. 

निरोगी डोळ्यांसाठी तुम्ही जर हे संकल्प 2023 मध्ये केले तर नक्कीच तुमची दृष्टी उत्तम राहील. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Health Tips : हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे होणारे आजार कोणते? आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget