Health Care Tips: : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' पेयाचे सेवन करा, कोरोनापासून होईल बचाव
Health Tips : कोरोनाकाळात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
Omicron Variant : कोरोनाकाळात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण चांगल्या आहारामुळे रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढत असते. ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठीदेखील योग्य आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काही पेयांचे सेवन केले पाहिजे. जाणून घ्या इम्युनिटी बूस्टर ड्रिंक कसं बनवायचं.
इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बनवण्यासाठी साहित्य -
गाजर, आल्याचा तुकडा, हळद, लिंबू.
इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बनवण्याची पद्धत -
इम्युनिटी बूस्टर ड्रिंक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात गाजर, आले आणि चिमूटभर हळद टाकून ज्यूस बनवा. त्यानंतर ते गाळून त्यात लिंबू टाकून प्या. हे रोज प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ओमायक्रॉनपासून बचाव करण्याचे उपाय
- ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात आधी रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी.
- रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करायला हवा.
- तसेच दररोज हिरव्या भाज्या आणि फळांचेदेखील सेवन करणे गरजेचे आहे.
- दररोज 30 ते 40 मिनिटे कोवळ्या उन्हात चालायला हवे. सूर्यामध्ये व्हिटॅमिन डी असते जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे.
- घराबाहेर पडताना, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावा.
ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने लोकांना त्रास दिला आहे. त्याच वेळी, अनेक रुग्णांमध्ये अशी तक्रार देखील दिसून आली आहे की, त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी केली, मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, त्यांना ओमायक्रॉनची सगळी लक्षणे दिसत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Health Care Tips: Drink this drink to boost your immune system, it will prevent corona
Omicron Variant: 5 वर्षांखालील मुलांना होतेय ओमायक्रॉनची लागण, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























