Kidney Health : बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच वाढत्या तणावामुळे अनेकांना शारीरिक आजारांचा सामना करावा लागतोय. यामध्येच किडनीशी संबंधित आजाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतेय. याचे मोठे कारण आपल्या काही वाईट सवयी देखील असू शकतात. आपल्या काही सवयींचा किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यातील सर्वात धोकादायक सवय म्हणजे जास्त धूम्रपान करणे. धूम्रपानामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि मूत्रपिंडांवर खूप दबाव येतो. जास्त धूम्रपान करणाऱ्या लोकांची स्थिती कधीकधी प्राणघातक ठरू शकते. किडनी निरोगी ठेवायची असेल तर या सवयी लगेच बदला.
1. धूम्रपान बंद करा : किडनी निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान सोडा. धूम्रपानामुळे किडनीवर दबाव येतो. कधीकधी परिस्थिती अशी होते की, ही सवय जीवघेणी ठरते. वास्तविक धूम्रपानामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि किडनीवर दबाव येतो.
2. बाहेरचे अन्न खाणे सोडा : किडनी निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. हेल्दी खाल्ल्याने वजन वाढते आणि अनेक आजार शरीरात वाढू लागतात. त्याचा किडनीवरही वाईट परिणाम होतो. तुम्ही सोडियम, प्रक्रिया केलेले मांस आणि किडनीला हानी पोहोचवणारे पदार्थ खाणे टाळावे.
3. आळस सोडा : काही लोक त्यांच्या फिटनेससाठी संपूर्ण दिवसातून अर्धा तासही काढू शकत नाहीत. कधीकधी याचे कारण आळशीपणा असतो. तुम्हालाही आळशीपणाची सवय असेल तर ही सवय लगेच बदला. याचा तुमच्या किडनीवरही परिणाम होतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास किडनीही निरोगी राहते.
4. जास्त पाणी प्या : किडनी निरोगी ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. काही लोक तहान लागल्यावरच पाणी पितात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीला खूप नुकसान होते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :